पुणे - मागील अडीच महिन्यांपासून राज्यातील सलून बंद आहेत. राज्यातील सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. मात्र, सलून व्यावसायिकांबद्दल अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने राज्य सरकारने सलून सुरू करण्यासंदर्भात नवी नियमावली तयार करावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सलून व्यावसाय सशर्त चालू करण्यास परवानगी देण्याचे यामध्ये अंतर्भूत आहे. शासनाला सलून बंद ठेवायचे असल्यास सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केलीय.
.. तर आधी आर्थिक मदत द्या, महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनची सरकारकडे मागणी - महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशन
सलून व्यावसायिकांबद्दल अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने राज्य सरकारने सलून सुरू करण्यासंदर्भात नवी नियमावली तयार करावी अशी मागणी महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे.