पुणे - राज्य सरकारने कुटुंब नियोजनासाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. देशातील वाढती लोकसंख्या हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो अनेक उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग देखील अनेक उपाय योजना राबवताना दिसत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनासाठी देखील अनेक उपक्रम हाती घेतले जातात. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने मात्र राज्यात मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
काय आहे राज्य सरकारचा नवीन निर्णय?
राज्य सरकारचा आरोग्य विभाग कुटुंब नियोजनाच्या समुपदेशनासाठी ज्या योजना राबवत त्या साठी राज्यातील आशा वर्कर्सचा समावेश असतो. मात्र, आता राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर ( Maharashtra govt adds rubber dildos in family planning kits ) आले आहे. सरकारच्या याच निर्णयाने एकच खळबळ उडालेली आहे.
कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये चक्क रबरी लिंग -
राज्यातील आशा सेविका अनेक खेड्यापाड्यात जाऊन कुटुंब नियोजनासाठी महिलांचे समुपदेशन करत असतात. मात्र आता राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आले आहे. मात्र यामुळे आशा सेविकांसमोर समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. हे रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्या किटमध्ये देण्यात आले आहे. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा - रबरी लिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, दोषींवर कारवाई होईल - पालकमंत्री राजेंद्र शिंगणे
आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. तर काहीजण या निर्णयाच्या समर्थनात तर काहीजण विरोधात जाताना पाहायला मिळत आहे.
आम्ही रबरी लिंग घेऊन जायचे कसे - आशा सेविका
अनेक अशा सेविकांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही सरकार विरोधात कसे बोलणार कारण शेवटी आमचं ते काम आहे. पण आम्ही किट घेऊन जाताना रबरी लिंग घेऊन जायचे तरी कसे असा सवाल करत आहेत. आम्ही कॅमेरासमोर बोलणार नाही पण या सगळ्यांचा आम्हाला त्रास होईल, हे मात्र नक्की असल्याचे संगितले आहे. त्यातच हा सगळा संवेदनशील मुद्दा असून आपल्याकडे लैगिंक शिक्षण आणखीन तेवढे सकारात्मक घेतले जात नाही. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुरार्विचार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात -
-
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..??
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…
आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून….
थोडी लाज ठेवा
मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..@CMOMaharashtra @rajeshtope11 https://t.co/5nnFV9RSuP
">सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..??
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 19, 2022
उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…
आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून….
थोडी लाज ठेवा
मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..@CMOMaharashtra @rajeshtope11 https://t.co/5nnFV9RSuPसरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..??
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 19, 2022
उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…
आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून….
थोडी लाज ठेवा
मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..@CMOMaharashtra @rajeshtope11 https://t.co/5nnFV9RSuP
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करताना सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल करत सरकारने उच्छाद मांडलाय असा घणाघात केला आहे. चित्रा वाघ यांनी थोडी लाज ठेवा असे सांगत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
तृप्ती देसाई यांचे या निर्णयाला समर्थन -
दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही. आशा वर्कर्सने सुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंब नियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. असे सांगत तृप्ती देसाई यांनी ही एक चांगली योजना असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - Padma Award : सायरस पूनावाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित