ETV Bharat / city

मोदी सरकारच्या नियमांचाही भाजपला विसर.. नियम मान्य मात्र कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उल्लंघन

author img

By

Published : Aug 30, 2021, 3:19 PM IST

राज्यात भाजपकडून केंद्र सरकारने दिलेल्या कोरोनासंबंधी सूचनांचेही उल्लंघन केले जात आहे. मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून आज झालेल्या आंदोलनात फक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि फक्त दोन ते चार पदाधिकारी सोडता एकाही कार्यकर्त्यांकडून नियमांचे पालन झालेले नाही.

bjp agitation in pune
bjp agitation in pune

पुणे - देशात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या केरळ राज्यानंतर महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ नोंदविली जात आहे. त्याचप्रमाणे केरळ आणि महाराष्ट्रातील उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. केंद्राकडूनही राज्याला वेळोवेळी सूचना देखील दिली जात आहे. असे असताना केंद्राकडून सूचना देऊनही राज्यात भाजपकडून केंद्राच्या सूचनांचेही उल्लंघन केले जात आहे. मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून आज झालेल्या आंदोलनात फक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि फक्त दोन ते चार पदाधिकारी सोडता एकाही कार्यकर्त्यांकडून नियमांचे पालन झालेले नाही. नियम मान्य पण ते नियम आम्हीच मोडू तेही केंद्र सरकारने सांगून देखील असे भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन आहे.

पुण्यात भाजपचे आंदोलन
केंद्र सरकारकडून अलर्ट देऊनही भाजपकडून नियमांचे उल्लंघन -
पुणे शहरात आज भाजपच्या वतीने मंदिर तसेच धार्मिक स्थळे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मास्क, सोशल डिस्टनसिंग याचा देखील या आंदोलकांना विसर पडला होता. कोरोनाच्या पाश्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने अलर्ट देऊनही भाजपकडून कोरोना नियम मोडण्यात येत होते.एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती असताना भाजपकडून राज्यात वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. एकीकडे जनआशीर्वाद यात्रेमुळे होणारी गर्दी तर दुसरीकडे मंदिरे उघडण्यासाठी करण्यात आलेले आंदोलन. यामुळे भविष्यात कोरोना वाढ होणार तर नाही ना, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.