ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी शिवसेनेकडून महाआरती

author img

By

Published : Aug 19, 2021, 8:56 PM IST

पुण्यामधील मोदी यांचा अर्धाकृती पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ केली आहे, ती कमी करण्यासाठी मोदी देवाचा धावा आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.

पुण्यातील पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी शिवसेनेकडून महाआरती

पुणे - औंधमधील पंतप्रधान मोदी यांचा अर्धाकृती पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ केली आहे, ती कमी करण्यासाठी मोदी देवाचा धावा आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी शिवसेनेकडून महाआरती

केंद्र सरकारने या मंदिराचा जिर्नोद्धाराचा खर्च उचलावा

पंतप्रधान मोदी यांचा अर्धाकृती पुतळा हटवला आहे. परंतु, मोदी यांचे याच जागी मंदिर बांधले जावे आणि केंद्र सरकारने या मंदिराचा जिर्नोद्धाराचा खर्च उचलावा अशी मागणी यावेळी कसबा शिवसेना मतदार संघातर्फे करण्यात आली. मोदीभक्त मयुर मुंडे यांना त्या मंदिराचे मुख्य पुजारी केले जावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. कसबा शिवसेना मतदार संघांतर्फे दांडेकर पूल येथील सद्गुरु मांगीर बाबा मंदिराच्या
परिसरात प्रसाद वाटप करण्यात आला.

शिवसेना मतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते

कसबा शिवसेना मतदार संघा तर्फे प्रसाद वाटप दांडेकर पूल येथील सद्गुरु मांगीर बाबा मंदिराच्या
येथे करण्यात आले. शिवसेनेचे पुणे शहर प्रमूख संजय मोरे, राजेंद्र शिंदे, अनंत घरत, प्रतीक अल्हाट, युवराज पारीख, गौरव सिन्नरकर, राहुल जेगटे व कसबा शिवसेना मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.