पुणे - सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे प्राध्यापक असणारे मंदार दिलीप पाटील वय ४०, आंबेगाव, कात्रज यांनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी फोल्ड सायकलचे डिझाइन तयार केले आहे. पाटील हे सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहे. या कॉलेजचा कॅम्पस हा खूप मोठा आहे. येथील विद्यार्थी हे कॉलेज ते हॉस्टेल हे अंतर कमी असले तरी विद्यार्थी हे दुचाकी घेऊन येतात. A bicycle made by an engineering professor त्यामुळे सगळीकडे विद्यार्थ्यांच्या दुचाकींची गर्दी दिसते. तसेच, सायकलस्वारांसाठी सायकल स्टँडची सुविधा नसल्याने सायकल वापरण्याचे प्रमाण कमी होत चालले होते. यावर उपाय म्हणून पाटील यांनी घडी करून बरोबर नेता येईल, अशा सायकलची निर्मिती करायची त्यांना कल्पना सुचली आणि तेथून त्यांनी सायकल बनवायला सुरवात केली.
१२ हजार रुपये इतकी किंमत पाटील यांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या कारखान्यात फोल्ड सायकलची डिझाईन बनवली आणि ती सायकल 3 वर्षापूर्वी बनवायला सुरवात केली. आणि पाहता पाहता त्यांनी पूर्णपणे फोल्ड सायकल बनविली आहे आणि त्या फोल्ड सायकलचे पेटंट देखील त्यांना मिळाले. या सायकलचे वजन हे 13 किलो असून यात चार प्रकारचे मॉडेल आहेत. मेबन मोबिलिटी इनोव्हेशन नावाने हे स्टार्टअप सुरु करून या सायकलची निर्मिती होत असून सध्या १२ हजार रुपये इतकी किंमत या सायकलीचे आहे.
सायकल वापरण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास पाटील यांना आहे आत्तापर्यंत 30 पेक्षा अधिक सायकल पाटील यांनी बनवल्या असून सहज रित्या फोल्ड करून ही सायकल उचलुन कुठेही नेहेता येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही सायकल पाहिजे तशी ऍडजेस्ट देखील होते. पुण्यात फिरायचे तर दुचाकीशिवाय पर्यायच नाही. १,२ किमीवर जायचे असेल तरीही आपण दुचाकी काढतो. यासाठीच महाविद्यालयीन दशेपासूनच जर सायकल चालवण्याची सवय लागली तर पुढेही सायकल वापरण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास पाटील यांना आहे.
अडचण या सायकलने सहजच दूर व्यायामाबरोबरच आर्थिक बचत आणि प्रदूषणमुक्ती अशा फायद्यांमुळे सायकल चालवण्यास जगभर प्रोत्साहन दिले जात आहे. पण सायकल स्टैंडअभावी आपली सायकल कुठे लावायची, ही मुख्य अडचण सायकलप्रेमीना नेहेमीच असते.पण आता ही अडचण या सायकलने सहजच दूर होणार आहे.
हेही वाचा - Twin Tower Demolished स्फोट झाला अन् काही क्षणातच पत्त्याप्रमाणे कोसळल्या ट्विन टॉवर्सच्या इमारती