ETV Bharat / city

आर्यन खान ड्रग केस : एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस - Kiran Gosavi Lookout Notice Pune

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. आता गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

Aryan Khan Drugs Case Kiran Gosavi Witness
किरण गोसावी लुकआऊट नोटीस पुणे
author img

By

Published : Oct 13, 2021, 8:19 PM IST

Updated : Oct 14, 2021, 2:47 PM IST

पुणे - सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. आता गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा - पुण्यात 14 वर्षीय युवतीची निर्घूण हत्या; शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी घेतली मुलीच्या आई-वडिलांची भेट

किरण प्रकाश गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. याबाबत पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

दरम्यान एनसीबीने एका क्रूझवर छापा टाकला होता. येथून आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. त्यादरम्यान गोसावी त्याच्यासोबत दिसून आला होता. तसेच, त्याने आर्यन खानसोबत एक सेल्फी देखील काढला होता. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी याच्यावर आरोप केले होते. त्यामुळे, कारवाईवरच संशय निर्माण झाला होता. दरम्यान एनसीबीने किरण याला पंच म्हणून नेल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळपासून किरण गोसावी चर्चेत आला होता.

पुणे पोलिसांनी आता त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता गृहित धरली असून, त्याने कोठेही जाऊ नये, यासाठी ही नोटीस काढली आहे.

गोसावी कसा काय पंचनामा करु शकतो -शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की आर्यन खान प्रकरणी भाजप कार्यकर्ता के. पी. गोसावी याला पंच करण्यात आले आहे. सध्या तो फरार असून मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. यावरुन पंचाच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. गोसावी यांनी पंचनामा केल्याचेही समजते. एनसीबीचे अधिकारी अशा लोकांना पंच करत असतील तर अधिकाऱ्यांची कोणत्या लोकांशी जवळीत आहे हे हायलाईट होते.

गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा

कार्डिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा एनसीबीने खुलास करत क्रूझवर केलेली कारवाई नियमानुसार केली आहे. तसेच या कारवाईत आर्यन खानसह आठ आरोपींना ड्रग्ससहित ताब्यात घेतले. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

एनसीबीच्या कारवाईत सहभागी मनिष भानुशाली, के. पी. गोसावी नेमके कोण?

मुंबईत एनसीबीने ३ ऑक्टोबरला मुंबई ते गोवा जाणाऱ्या क्रूझवर कारवाई केली होती. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांच्यासह आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना पकडून एनसीबी कार्यालयात आणणाऱ्यांमध्ये भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईत खासगी व्यक्तींचा सहभाग कसा? असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला आहे.

किरणला अटक करा, नाहीतर गोळ्या घाला, आमचा संबंध नाही - प्रकाश गोसावी

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी NCBच्या अटकेत असलेल्या आर्यन खानसोबत कोर्टात सेल्फी काढणाऱ्या पंच किरण गोसावीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील पंच मनिष भानुशाली हा एका पक्षाचा पदाधिकारी आहे, हा गौप्यस्फोट केला होता. तर आता याच प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्यावर मुंबई आणि ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. या किरण गोसावीशी कुटुंबीयांनी गेल्या १०-१२ वर्षांपासून संबंध तोडले आहेत. त्याचा आणि आमचा काहीही एक संबंध नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया किरण गोसावीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नेहमीच दबावात असतात - चंद्रकांत पाटील

Last Updated : Oct 14, 2021, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.