पुणे - पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाला आहे. ४ दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणातील पाणी पातळी वाढली आहे. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने आज (सोमवार) भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
भुशी डॅमची पाणी पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा मध्ये दाखल होत आहेत. रविवारी दिवसभर पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांनी धब-धब्यांचा आनंद लुटला. सुट्टी असल्याने अनेकजण कुटुंबासमवेत पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा परिसरात दाखल झाले होते.
मुंबई-पुण्याचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भूशी धरण कधी ओव्हर-फ्लो होईल याची वाट दरवर्षी पाहतात. रविवार आणि शनिवारी मुंबई-पुणे या दृतगती महा-मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू असते. या पावसामुळे पर्यटकांना चांगली मज्जा येत आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी ओसंडून वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला.