ETV Bharat / city

'दीड महिन्यांपासून घेतली नव्हती हो..' पण आता पोलीस म्हणतायेत घरी जा, पुण्यात मद्यपींची निराशा

महाराष्ट्र सरकारने आजपासून राज्यात सर्वत्र कंटेनमेंट भाग वगळता दारू विकण्यास परवानगी दिली होती. पुण्यात आज सकाळी सहा वाजल्यापासूनच वाईन शॉपसमोर ग्राहकांच्या रांगा लागायला सुरूवात झाली होती. दारूसाठी तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागल्या होत्या, मात्र पोलिसांनी सर्वांना घरी जायला सांगितले...

coronavirus lockdown Sale of liquor in state start from today

author img

By

Published : May 4, 2020, 11:26 AM IST

पुणे - तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन ग्राहक दारू खरेदीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे होते. अनेक दिवसानंतर दारू मिळणार असल्याने त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर कूपन घेण्यासाठी ज्या प्रमाणे रांग लागते, तशीच रांग दारुसाठी लागली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्याने वाईनशॉप काही सुरु झाले नाही. त्यामुळे तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची मोठी निराशा झाली. वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले. त्यानंतर मात्र, संताप व्यक्त करत मद्य प्रेमींनी घराचा रस्ता धरला.

दारू न मिळाल्याने निराश झालेल्या दारू ग्राहकांच्या प्रतिक्रिया...

'तुम्हीच सांगा काय करू'

यावेळी मद्य प्रेमींच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. आम्ही टीव्ही वरच्या बातम्या पाहून आलो होतो. सकाळी सहा वाजल्यापासून उभे आहोत. आणि आता आम्हाला जायला सांगतायेत. तुम्हीच सांगा आम्ही काय करू, अशा शब्दात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा... #LOCKDOWN : राज्यात दारू विक्रीला परवानगी; काही ठिकाणी गर्दी तर काही भागात बंदी !

राज्य सरकारने आजपासून राज्यात दारू विक्री करण्यास परवानगी दिली आहे. रेड झोनमधील कंटेनमेंट भाग वगळता सशर्त परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहर देखील रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे येथेही कंटेनमेंट भाग वगळता दारू विक्री होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दारू विक्री करता येणार आहे.

पुणे शहरात आज सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप समोर गर्दी केली होती. सकाळी सहा वाजल्यापासून वाईन शॉपसमोर ग्राहकांच्या रांगा लागायला सुरूवात झाली होती. दारूसाठी तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे चित्र आज पुण्यात पहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.