पुणे - दिवाळीनिमित्त शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर 101 पणत्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशान्वये सद्या मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही दगडूशेठ हलवाई मंदिराबाहेर करण्यात आलेला दिपोत्सव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. दिवाळीला अशा प्रकारे दिव्यांची आरास करण्याची ही पंरपरा गेल्या 127 वर्षापासून सुरू आहे.

कोरोनाच्या महासंकटात भाविकांनी ज्या प्रमाणे गर्दी टाळत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजना व नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे यंदाची दिवाळीही साजरी करावी. कोरोना संकट अजून संपलेले नाही, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच नागरिकांनी दिवाळी साजरी करावी, असेही आवाहन यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.
