मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ साठी दहावीच्या परीक्षा ( 10th exam result ) घेण्यात आल्या होत्या. या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार ( SSC result today ) आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गतवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची वेबसाईट क्रॅश झाली होती. साईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यात अडचणींचा सामना करावा लागला होता.
मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल - पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ( Maharashtra SSC result ) उद्या दुपारी १ नंतर ऑनलाईन उपलब्ध ( SSC results website links ) होणार आहे.
कोणत्या विभागात किती विद्यार्थी - राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 ची दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान झाली. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी हे नऊ विभागांपैकी मुंबई विभागातील आहे. मुंबई विभागात तीन लाख 73 हजार 840 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नोंदणी केली आहे. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 122, पालघर जिल्ह्यात 61 हजार 866, रायगड जिल्हात 36 हजार 996, मुंबई पश्चिम 65 हजार 497, मुंबई उत्तर 51 हजार 868 आणि मुंबई दक्षिण 33 हजार 590 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा- इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा-Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची साईट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी
हेही वाचा-SSC Result 2021 : दहावीत यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, येथे बघा तुमचा निकाल