ETV Bharat / city

पुणे : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी 'इतके' उमेदवार रिंगणात;बंडखोरी टाळण्यात भाजपसह राष्ट्रवादीला यश

पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरी मिटवण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे.

author img

By

Published : Nov 17, 2020, 7:07 PM IST

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ

पुणे- पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची आज मुदत संपली आहे. पुणे दवीधरचे 16 तर शिक्षकांनी तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरी मिटवण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे.

बंडखोरी टाळण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला यश-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप माने यांनी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचा मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेचे एन. डी. चौगुले यांनी अर्ज भरला होता. त्यांनीदेखील माघार घेतली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांना बंडखोरी टाळण्यात यश आले आहे.

इतके झाले अर्ज बाद

पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षांच्या 13 उमेदवारांसह 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये पदवीधर मतदारसंघातील 15 अर्ज, तर शिक्षक मतदारसंघातील तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 78 आणि 50 उमेदवार रिंगणात राहिले होते.

अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट -
पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यात प्रमुख लढत आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपने राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवित आहेत.

१ डिसेंबरला रोजी मतदान होणार-

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून पुणे पदवीधर मतदार संघातून सांगलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संग्रामसिंह हे माजी आमदार संपतराव देशमुख यांचा मुलगा आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत भाऊ आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते पारंपरिक राजकीय शत्रू मानले जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.