पुणे: पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीची किरण नावगिरेची भारतीय महिला संघात निवड Kiran Navgire selected in Indian womens team झाली आहे. ती 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठ महिलांच्या ब्रिटन येथील टी-20 दौऱ्यात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय संघात स्थान मिळविणारी किरण पहिलीच पुण्यातील खेळाडू आहे. ज्या वेळेला किरण हिची भारतीय संघात निवड झाली. त्यावेळेस तिला महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, आझम स्पोर्ट्स अकादमीचे Azam Sports Academy Pune संचालक डॉ. गुलजार शेख यांच्या वतीने गौरविण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील मिरे या गावाची Cricketer Kiran Navgire किरण आहे. तिचे आई वडील हे शेतकरी आहे. ती जेव्हा महाविद्यालयीन स्पर्धा खेळण्यासाठीआझम कॅम्पस येथे आली होती, तेव्हा तिने एकाच ओव्हरमध्ये दोन लांब लचक षटकार मारले होते. त्यानंतर आझम कॅम्पसचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी किरण हिला आझम कॅम्पस स्पोर्ट अकादमी येथेच सराव करावा, असे सांगितले. तेव्हा पासून किरण हिने आझम कॅम्पस येथे सराव सुरू केला. आज तिची भारतीय महिला क्रिकेट संघात Indian Womens Cricket Association निवड झाल्याने सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
ज्या वेळेस मला कळाल की माझी भारतीय संघात निवड झाली आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. जेव्हा महिला आयपीएल, श्रीलंका दौरा आणि कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा झाली, तेव्हा माझी निवड झाली नाही. तेव्हा मला वाटलं की यावर्षी माझी काही निवड होणार नाही. मला डोमेस्टिकमध्ये चांगला स्कोर करावा लागेल, म्हणून मी सरावासाठी पाँडिचेरीला गेले. पण तिथे गेल्यावर मला कळाल की, माझी निवड भारतीय संघात झाली आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला, असे यावेळी किरण नावगिरे हिने सांगितले.
विविध स्पर्धांमध्ये खेळताना मला चांगला अनुभव मिळाला. या स्पर्धांमध्ये देखील खेळताना मी माझा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजीचा सराव करण्याबरोबरच सातत्याने फिटनेसकडे देखील लक्ष दिले. कोणत्याही खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. मेहनत आणि सर्वांचे मिळालेले पाठबळ यांच्या जोरावरच आज पर्यंतचा प्रवास करू शकले. असे यावेळी किरण हिने सांगितले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले की, गेल्या 4 वर्षांपासून किरण आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करते. ती गुणवान खेळाडू असल्याने तिला सर्वच सुविधा अकादमीच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. मुलींनी देखील खेळाच्या विश्वात आपले नाव कोरण्यासाठी, आझम स्पोर्ट्स अकादमी गुणवान खेळाडूंच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभी आहे.
आता पर्यंतच्या वाटचालीत आझम स्पोर्ट्स अकादमीच्या Azam Sports Academy Pune खेळाडूंनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. विशेषत मुलीसाठी अनेक चांगले उपक्रम आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने चालविण्यात येतात. या उपक्रमांद्वारे आम्हाला किरण मिळाली. किरणला खेळताना पाहून आज अनेक मुलींचा क्रीडा क्षेत्राकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे, असे यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे उपाध्यक्षा आबेदा इनामदार म्हणाल्या.
खेळातील जिद्द पाहून किरणची निवड करण्यात आली. किरणसाठी चांगले प्रशिक्षक निवडणे, डाएट, फिटनेस यासाठी किरणच्या बरोबरीने आम्ही देखील मेहनत घेत होतो. किरण करत असलेल्या मेहनतीमुळे तिची आज भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याचा आम्हाल आनंद होत आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर किरणची आक्रमक फलंदाजी ही भारतीय संघाला फायदेशीर ठरणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. असे यावेळी आझम स्पोर्ट्स अकादमी डायरेक्टर डॉ. गुलजार शेख यांनी सांगितलं.
हेही वाचा - Asia Cup 2022 Ind Vs Pak भारत पाक आज महामुकाबला, सामन्याबद्धल जाणून घ्या सर्वकाही