ETV Bharat / city

किरण गोसावीची आजची रात्र येरवडा तुरुंगात

किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मधे जो गुन्हा नोंद असल्याने किरण गोसावीला अटक करण्यात आली. त्यानंतर किरण गोसावी कडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली.

Kiran gosavi
Kiran gosavi
author img

By

Published : Nov 9, 2021, 6:50 PM IST

पुणे : - किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हाबाबत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात अली असून त्याला आजची रात्र येरवडा तुरुंगात घालवावी लागणार आहे.

लष्कर पोलीस घेणार ताबा
पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्हाबाबत पोलीसांनी त्याला अटक दाखवून त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय. ती प्रक्रिया पुर्ण झाल्यावर किरण गोसावीला उद्या लष्कर पोलीसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

गोसावी विरोधात पुण्यात चार गुन्हे दाखल
किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मधे जो गुन्हा नोंद असल्याने किरण गोसावीला अटक करण्यात आली. त्यानंतर किरण गोसावी कडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली. आज फरासखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हात पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पण लगेच लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी गोसावीला त्यांच्याकडे नोंद असलेल्या गुन्हाबाबत ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु केलीय.

काय आहे प्रकरण
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरण कोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांचं पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झालं आहे. मात्र तो आपले ठिकाण वरोवर बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र नंतर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून कोर्टात हजर केले होते. यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे आयकून न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी सुरवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोठडीत 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र आज त्याला न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले.

हेही वाचा - कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने कामगाराची बँकेच्या खिडकीला गळफास घेवून आत्महत्या

पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी
आरोपी किरण गोसावी हा तपासात कोणत्याही प्रकाराच सहकार्य करीत नाही.यामुळे पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी फिर्यादीच्या वकीलाकडून करण्यात आली.त्यावर आरोपीचे सचिन कुंभार यांनी फिर्यादीच्या वकिलांचे आरोप खोडून करण्याचा प्रयत्न केला.मात्र अखेर न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

कोण आहे गोसावी
क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोसावी वादात अडकला आहे. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत.

पुणे पोलिसांनी गोसावीच्या शोधत
नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला. गोवासीवर फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जाहीर केली होती

काय आहे प्रकरण
किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध घेत होते.

पालघर पोलीसाचा संपर्क
किरण गोसावी यांच्या विरोधात पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर होते. आता पालघर पोलीस गोसाविला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा - ..तर एसटी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.