पुणे - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. तक्रारदाराच्या वकिलाने केलेल्या मागणीनुसार न्यायालयाने गोसावी अजून 3 दिवसांची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे किरण गोसावीची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे.
किरण गोसावीवर पुण्यासह राज्यात एकूण 9 गुन्हे गोसावी दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा-Mumbai Drug Case : मुंबई पोलिसांनी पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला
म्हणून वाढवण्यात आली आहे पोलीस कोठडी-
किरण गोसावी प्रकरणात काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात किरण गोसावी हा एकटाच आरोपी नसून त्या बरोबर असलेले ऍक्युस देखील त्यात सहभागी आहे. त्यासंबंधितदेखील तपास होण्यासाठी पोलिसांनी सुरवातीला आठ दिवसांची कोठडी घेण्यात आली होती. पण त्यात काही डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट फॉरेन्सिक हे सायबर फॉरेनसीशी निगडित असल्याने त्याच्यामधला डाटा हा रिटरिव्ह करणे गरजेचे असल्याचे तक्रारदाराचे वकील राहुल कुलकर्णी यांनी सांगितले. गोसावी याला पुढील 3 दिवसांसाठी म्हणजेच 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्याचबरोबर गोसावी याच्या विरोधात राज्यात 9 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अजूनही कोणत्याही पोलिसांनी गोसावी यांचा रिमांड मागितले नाही, अशी माहिती तक्रारदाराचे वकील राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे.
हेही वाचा-पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक
पुण्यात 3 गुन्हे दाखल
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. फसवणूक झालेल्या तरुणांनी तक्रार करण्याचे पुणे पोलिसांनी आवाहन केल्यानंतर प्रकाश माणिकराव वाघमारे या तरुणानेदेखील तक्रार केली आहे. त्यानंतर गोसावी याच्यावर पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावी यांच्याविरोधात पुण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकीसंदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे.
हेही वाचा-पुणे पोलीस किरण गोसावीला घेऊन मुंबईत; घराची, कार्यालयाची करणार तपासणी
के. पी. गोसावी नेमका कोण? -
किरण गोसावी हा देशभरात, विदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.