ETV Bharat / city

Pune Crime एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह

Pune Crime पिंपरी- चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Sep 10, 2022, 6:59 PM IST

पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Pune Crime अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे. या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. Kidnapping and murder घटनेला वेगळं वळण मिळावं, म्हणून आरोपींनी अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाच्या कुटुंबियांना 20 कोटींची खंडणी मागितली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस Pimpri Chinchwad Police आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे ( Commissioner Police Sanjay Shinde ) यांनी कौटुंबिक कारण पुढे करत मूळ कारण सांगण्यास नकार दिला आहे. सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून

सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण गुरुवारी या 7 वर्षीय मुलाच राहत्या सोसायटीच्या पार्किंग मधून अपहरण झालं होतं. याबाबत खून झालेल्या मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. पिंपरी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकासह शेकडो पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, आरोपी मंथनच 7 वर्षीय मुलाच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे पुढे आलं आहे. तसेच दोन्ही कुटुंबात वाद झाले होते. याच रागातून आरोपी मंथनने मित्र अनिकेतच्या मदतीने 7 वर्षीय मुलगा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण केलं तिथंच त्याच नाक आणि तोंड दाबून खून केला आहे. या अपहरणाचा कट गेल्या 10 दिवसांपासून रचला गेला होता. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह भोसरी MIDC परिसरातील पडक्या इमातीवरील टेरिसवर नेहून ठेवला.

दरम्यान, आरोपी मंथनच पोलिसांसह आरोपीचा शोध घेत होता. त्यांच्या तपासात तो अडथळे आणत होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले आणि साथीदारासह मंथनला अटक करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून त्याने खून केल्याची कबुली दिली, असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निर्जनस्थळी कानाडोळा ? बनला नशेचा अड्डा ! ज्या ठिकाणी अपहरण करून धीरजचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिथं अनेक गुन्हेगारी वृत्तीचे व्यक्ती ड्रग्स, गांजा, घेत असल्याचे समोर आलं आहे. तिथं इंजेक्शन, दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. यामुळं पिंपरी- चिंचवड पोलिसांच याकडे लक्ष नाही का ?असा प्रश्न उपस्थित होत असून घटनेचा मूळ कारणापर्यंत जाण्यास पत्रकारांना रोखलं जात आहे. अपहरणाचा प्रकरणात कौटुंबिक वाद असल्याच सांगून अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे हे दिशाभूल करत आहेत का ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस तात्काळ आरोपी पर्यंत पोहचले असते, तर आज अपहरण झालेला 7 वर्षीय मुलगा सुखरूप सापडला असता. त्यांच्या मृत्यू ला जबाबदार नक्की कोण अस विचारलं जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.