ETV Bharat / city

Jitendra Avhad on OBC Reservation : मी आजही वक्तव्यावर ठाम - मंत्री जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ओबीसी आरक्षण

फॅमिली पार्श्वभूमी नसताना गेल्या 12 ते 13 वर्षापासून राजकारणात आलो आहे. सध्याच्या पातळीवर जे काही खालच्यापातळीवर राजकारण सुरू आहे. ते मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. असेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad on OBC Reservation) म्हणाले.

Jitendra avhad
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 9, 2022, 6:28 PM IST

पुणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर (Jitendra Avhad on OBC Reservation) त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यावर रविवारी झालेल्या वंजारी समाजाच्या मेळाव्यात विचारले असता, आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. जे आधी बोललो तेच कायम आहे. पोटात एक आणि ओठात एक असं बोलणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे बोलतो हृदयापासून बोलतो, असेही यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुण्यात राज्यस्तरीय वंजारी समाजाचा महामेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना
सध्याचे राजकारण डर्टी पॉलॅटिक्स फॅमिली पार्श्वभूमी नसताना गेल्या 12 ते 13 वर्षापासून राजकारणात आलो आहे. सध्याच्या पातळीवर जे काही खालच्यापातळीवर राजकारण सुरू आहे. ते मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. मनाचा मोठेपणा शरद पवार, गोपीनाथ मुंढे यांच्याकडे दिसतो. तो आज दिसत कोणाकडेही दिसत नाही.आजकाल जे काही सोशल मीडिया तसेच पर्सनल अटॅक सुरू आहे. ते अत्यंत कठीण आहे. मी माझ्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने, मोर्चे काढले. पण कोणाच्या घरावर गेलो नाही. कोणाच्या बायका पोरांना त्रास होईल, असे कधीच केले नाही. आत्ता नवीनच निघालं आहे. मी काही बोललो की लगेच घरावर मोर्चा. हे काय आहे. माझा पुतळा जाळा, आंदोलने करा. विरोधी पक्षात आहे जे करायचं आहे. ते करा पण माझी मुलगी घाबरले, माझ्या घरच्यांना त्रास होईल. हे डर्टी पॉलॅटिक्स आहे. असे माझं म्हणणं आहे. असेही आव्हाड म्हणाले.

समाज कसं व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करावं
राज्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गोंधळाच वातावरण निर्माण झालं आहे ,अशी टीका विरोधी पक्षाच्या माध्यमातून केली जात आहे. याबाबत आव्हाडांना विचारलं असता ते म्हणाले की, कोरोना हे काही विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष बघत नाही. तर समाज कसे व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून काय ओमायक्रॉन होणार अथवा वाढणार नाही, असेही यावेळी आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - Mumbai Sea Incident : मुंबईच्या समुद्रात मित्रासोबत फिरायला गेली तरुणी, जोरदार लाट आली अन् झालं 'असं' काही..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.