पुणे - राज ठाकरेंचा ( Jayant Patil on raj Thackeray loudspeaker issue ) हा निव्वळ खोडसाळपणा असून, समाजात ते तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे यांनी भोंग्याविषयी मागणी करायची तर तिकडून ओवेसींनी वेगळीच मागणी करायची आणि समाजात तेढ निर्माण करून त्याचा फायदा निवडणुकीत करून घ्यायचा, अशीच त्यांची वृत्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil comment on loudspeaker ) यांनी केली आहे.
हेही वाचा - Pune NCP Vs MNS : पुण्यात राष्ट्रवादीची मंदिरात इफ्तार पार्टी तर मनसेची राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची आरती
राज ठाकरे ( Raj Thackeray mosque loudspeaker comment ) जे काही करत आहेत ते फक्त मतं मिळवण्यासाठी करत असून त्यांचे लक्ष देवावर नाही, तर निवडणुकीत मिळणाऱ्या मतांवर आहे, अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली. राज ठाकरे यांचा प्रयत्न समाजात दंगे व्हावेत एवढाच असल्याचे जयंत पाटील म्हणाले. राज ठाकरेंनी जो अल्टिमेटम दिला आहे त्यावर गृहखाते कारवाई करणार, असे सूचक वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
पुण्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वधर्मीय हनुमान जयंती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तर दुसरीकडे हनुमान जयंतीच औचित्य साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Jayant Patil comment on raj Thackeray ) यांच्या हस्ते हनुमानाची आरती करत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले होते. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरती करत हनुमान चालीसेचे पठण केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवाच्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्यावरून जे काही विधान केले होते त्यांच्या या विधानावरूनच जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर ही टीका केली.
हेही वाचा - Shivsena on Chandrakat Patil : ...हिमालयात कधी जाताय ?, शिवसेनेची बॅनरबाजी