पुणे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीच्या माध्यमातून भारतातील आयटी क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातील आयटी क्षेत्र हे नेहमीच अमेरिका आणि इतर देशांना सॉफ्टवेअर तंत्रज्ञान निर्यात करत आहे. खासकरून अमेरिका हा भारतीय आयटी क्षेत्राचा मोठा ग्राहक आहे. यामुळे भारतातील आयटी क्षेत्र हे पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून असल्याचे बोलले जाते.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरीच्या काळात भारतीय आयटी क्षेत्रातील घेतलेले निर्णय तसेच यासंदर्भात लादलेले निर्बंध आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा होती. त्यामुळे आयटी क्षेत्राबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबाबत काही नरमाई होते का, हे या दौऱ्यानंतर स्पष्ट होईल. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले ते केवळ व्यावहारिक नाही तर सामाजिक विचारांचा पुरस्कार करत होते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे व्यावहारिक धोरण त्यांनी अवलंबले. ट्रम्प यांनी भारतातील कंपन्या तसेच भारतीयांच्या व्हिसाबाबत कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे भारत भेटीदरम्यान भारतीय आयटी क्षेत्राला दिलासा देणाऱ्या गोष्टी यांच्या माध्यमातून तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -
नमस्ते ट्रम्प : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा पहिला दिवस पहा फोटोंमधून..
नमस्ते ट्रम्प : ताजमहाल पाहून भारावले ट्रम्प दाम्पत्य, आता दिल्लीला रवाना..