ETV Bharat / city

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपची पुण्यात आयकर विभागाकडून चौकशी - Anurag Kashyap news

प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या दोघांच्या मुंबईतल्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली होती.

pune
pune
author img

By

Published : Mar 4, 2021, 9:02 PM IST

पुणे - प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या दोघांच्या मुंबईतल्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली होती. ही कारवाई गुरूवारी देखील सुरू होती. तसेच सध्या पुण्यात असलेल्या अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची पुण्यातच आयकर विभागाने चौकशी केली जाते. हे दोघे सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने पुण्यात होते. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील वेस्टीन हॉटेलमध्ये या दोघांची चौकशी आयकर विभागाने केली आहे.

हेही वाचा - शिवसेना बंगाल निवडणूक लढवणार नाही, ममता बॅनर्जींना दिला पाठिंबा

दोघांची पुण्यात चौकशी -

दरम्यान, या चौकशीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले. तसेच या चौकशीला उत्तर देताना आमच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची माहिती आमच्या सीएकडे आहे, असे उत्तर दिल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे, तापसी तसेच अनुराग यांनी जे व्यवहार केेले ते करताना आवश्यक असलेला कर भरला आहे का? तसेच त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीवरील कर त्यांनी भरला आहे का? याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे..

हेही वाचा - जळगाव वसतिगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर; गृहमंत्र्यांची माहिती

पुण्याबरोबर मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी देखील दोघांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर यांना ही चौकशी संपल्यानंतर एक नोटीस देखील बजावली जाईल, ज्यामध्ये यापुढे गरज लागली तर या चौकशीसाठी हजर राहतील, अशी नोटीस देखील बजावली जाण्याची शक्यता आहे.

28 ठिकाणी हे धाडसत्र

मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मीडिया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झाला त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशोब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याचे आयकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींमधे आणि त्यांच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये 350 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर तापसी पन्नूच्या घरातून पाच कोटी रुपयांच्या रोख रकमेची पावती देखील सापडली आहे. या दोघांच्या कंपन्यांनी दाखवलेल्या खर्चापैकी वीस कोटी रुपयांचा खर्च हा बोगस आढळून आला, असेही आयकर विभागाने म्हटले आहे. दोघांकडून आणि त्यांच्या कार्यालयातुन ई मेल, व्हॉट्सअ‌ॅप आणि लॅपटॉप - कॉप्युटर्सच्या हार्ड डिस्कमधुन मोठ्या प्रमाणात डेटा देखील ताब्यात घेण्यात आला आहे. या दोघांची सात बॅंक लॉकर्स देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.