ETV Bharat / city

Palkhi Sohla In United States : अमेरिकेतही भारतीयांनी 44 डिग्रीत साजरा केला पालखी सोहळा - 44 degree temperature

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अमेरिकेत स्थायिक असलेल्या नागरिकांनी देखील आषाढी एकादशीनिमित्त पालखीची मिरवणूक ( Palkhi on the occasion of Ekadashi ) काढली होती. टाळ मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात यावेळी नागरिकांकडून मिरवणूक काढण्यात आली होती. आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरात अनेक भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन डालास फोर्ट वर्थ मंदीर ( Dallas Fort Worth Temple ) या संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने परप्रांतिय सहभागी झाले होते.

Palkhi sohla
पालखी सोहळा
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:32 PM IST

डालास (अमेरिका) / पुणे - दोन वर्षानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात तसेच आषाढीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांच्या ( devotees ) उपस्थितीत यंदाचा पालखी सोहळा पार पडला. फक्त राज्यात नव्हे तर जगातीक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिका ( America ) देशातील डालास शहरातही भारतीयांनी 44 डिग्री तापमानात ( 44 degree temperature ) आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadhi Ekadashi ) पालखी सोहळा साजरा केला.

पालखी सोहळा

पालखीची मिरवणूक काढली - पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अमेरिकेत स्थायिक असलेल्या नागरिकांनी देखील आषाढी एकादशीनिमित्त पालखीची मिरवणूक ( Palkhi on the occasion of Ekadashi ) काढली होती. टाळ मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात यावेळी नागरिकांकडून मिरवणूक काढण्यात आली होती. आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरात अनेक भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन डालास फोर्ट वर्थ मंदीर ( Dallas Fort Worth Temple ) या संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने परप्रांतिय सहभागी झाले होते.

पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर - पंढरपूरमध्येही ( Pandharpur ) आषाढी एकादशीचा ( Ashadhi Ekadashi ) सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. राज्याच्या ( state ) कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर उसळल्याचे चित्र निर्माण झाले होते. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर, पंढरपूरात गर्दी वाढत असतानाच पावसामुळे सर्व भाविकांना ( devotees ) अडचणींचा सामना करावा लागला होता.

विठ्ठल-रुक्मिणीला एक कोटींचा मुकुट - दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर पंढरीमध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली. यावर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीला तब्बल अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयांचे सोन्याचे मुखवट भेट म्हणून देण्यात आले. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार यांनी हा श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट भेट म्हणून दिला. विजयकुमार उत्तरवार हे उमरी येथील सोने चांदीचे व्यापारी आहेत. यापूर्वी अनेक भाविक भक्तांकडून विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर विविध आभूषने, अलंकार, दागिने देण्यात आले आहे.

हेही वाचा - Shiv Sena Support Droupadi Murmu : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला शिवसेना पाठिंबा देणार - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.