पुणे : आपल्या वाडवडिलांमुळे आपली कीर्ती जगात आहे. आपले साम्राज्य हे राज्यकर्त्यांचे नाही तर ते धर्मसाम्राज्याचे आहे. सगळ्यांना जोडणारे सगळ्यांना उन्नत करणारे हे साम्राज्य आहे. सगळ्यांना मानवता शिकवणारे हे साम्राज्य आहे. ते साम्राज्य उभे करण्याची जबाबदारी भारतावर येऊ घातली आहे. वाट पाहतोय भारत कधी तयार होत त्याची आहे. आपल्याला जर तयार व्हायचं असेल तर त्याचा तंतोतंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याकडून तयार झालेली इतिहासाची धारा आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात मोहन भागवत यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन : पुण्यात डॉ. केदार लिखित शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य हा ग्रंथ आणि त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी लढाई होती तीच लढाई आज आहे. आजच्याही परिस्थितीत लढाई तीच आहे. दानवतेची मानवतेसोबत लढाई सुरू आहे. असुरांची-देवांची लढाई आहे.
विश्वकल्याण आणि विश्वबंधुतेचे राज्य देण्याची क्षमता भारतातच : जगाला शांतता, विश्वास आणि विश्वकल्याणाचे प्रशासन देणारे केंद्र हे भारतच असणार आहे. कारण दुसरं कोणीही हे करू शकत नाही. त्या ताकदीने आपल्याला लढावं लागणार आहे. मग ती आस्था, ध्येयवाद, श्रद्धा आपल्यात आणावी लागेल. ते शील ते चारित्र्य आपल्या अंगी आणावे लागेल. तो पराक्रम, ते साहस आपल्या अंगी आणावं लागेल. सगळ्यांना जोडून सगळ्यांना उभे करून कोणताही भेद न पाहता सगळ्यांना आपलं बनवायची कला आपल्याला शिकावी लागेल. असेदेखील यावेळी भागवत म्हणाले.
हेही वाचा : Shambhuraj Desai on CM : अडीच वर्षे केवळ नावालाच राज्यमंत्री - शंभूराज देसाई यांचे गंभीर आरोप