पुणे - सध्या राज्यात सर्वदूर पाऊस ( Rain In Maharashtra ) पडत आहे. त्यामुळे गरिब जनतेच जनजीवन विस्कळीत होत आहे. शाळांवर त्याचा परिणाम पहायला मिळतो आहे. अनेक गावांत शाळांना सुट्टी जाहीर ( School Closed due to rain )करण्यात आली आहे. शेतात पूराचे पाणी गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पूर - सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पूर आला ( Flood in Chandrapur ) असून, सर्व सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. हौशी लोक जीव जोखमीत टाकून मासेमारी ( Hobbyists Risking Their Lives in Fishing ) करीत आहेत.पाच ते दहा किलोपर्यंतचे मासे सापडतात. मागील काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे येथे ही स्थिती निर्माण झाली आहे. धोतर, कापड, कोरपना आणि जिवती तालुक्यातील परिसरात सिंचनाचे काम करतो. तसेच हा प्रकल्प मासेमारीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती केली मच्छरदानी आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोक येथे पोहचत आहेत आणि तासन् तास येथे मच्छिमारी करण्याचा आनंद लुटत आहे. मात्र, हे सर्व ते आपला जीव जोखमीत टाकून करीत आहेत.
यवतमाळमध्ये गावांचा संपर्क तुटला - यवतमाळ जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( Rain continues in Yavatmal ) आहे. यामुळे वणी तालुक्यात नदी, नाल्यांना पूर ( Flood in Wani taluka ) आला आहे. निरगुडा नदीच्या काठी वसलेल्या नविन आणि जुन्या सावंगी गावाचा बॅक वॉटरमुळे संपर्क तुटला आहे. आज नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या ९ लोकांना शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. वणी तालुक्यातील ( Flood in Wani taluka ) जुगाद, साखरा, सावंगी, घोन्ता, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निरगुडा नदी वर्धा नदीला मिळते. मात्र, वर्धा नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा वेढा गावांना बसत आहे. सावंगी या गावाला सुद्धा एक ते दीड किलोमीटर बॅकवॉटरचा वेढा बसलेला आहे. नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक बटर असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.
मुंबईचे जनजीवन विस्कळीत - गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र, पुढील दोन दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सांगलीत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ - संततधार पडणाऱ्या पावसामुळे सांगली ( Heavy rain in Sangli ) जिल्ह्यातल्या कृष्णा, ( Krishna River ) वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. वारणा नदी गेल्या तीन दिवसांपासून पात्रा बाहेर आहे, तर कोयना धरणातून सोडण्यात ( Release of water from Koyna dams ) आलेलं पाणी आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 37 मिली मीटर पाऊस झाला आहे. तर, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी ( Heavy rain in Chandoli Dam ) कायम आहे. गेल्या 24 तासात 77 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे 34.40 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या धरणात आता 21.54 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला असून धरण 62 टक्के भरले आहे.
नाशिकमध्ये अनेक भागात पाणी साचले - जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. (Heavy rain in Nashik) दिवसभरात शहरात अनेक भागात धुंवाधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अशात क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील (Jamtha of Vidarbha Cricket Association ) मैदानात आणि परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सुमारे गुडघाभर पाणी साचल्यानचे बघायला मिळाले. तर क्रिकेट स्टेडियम जलमय झाल्याचे चित्र दिसून आले.
विशाळगडावरील ढसाळला - विशाळगडावरील बुरुज सुद्धा पावसामुळे ढसाळला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे ( Vishalgad collapsed due to heavy rain ) अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र गेल्या शेकडो वर्षांपासून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत गडकिल्ले पाय घट्ट रोवून उभे आहेत. तेच आता ढासळत चालले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. नुकतंच पन्हाळा गडावरील सुद्धा बुरुजाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर कोल्हापुरात संवर्धनाच्या मागणीसाठी एक चळवळ उभी राहत आहे. असे असतानाच आता विशाळगडाचा सुद्धा बुरुज कोसळला आहे.
पुढील २४ तासांचा अंदाज - पुढील २४ तासांत दक्षिण गुजरातमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, आग्नेय राजस्थान, ओडिशाचा काही भाग, दक्षिण छत्तीसगड, किनारी कर्नाटक, केरळच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणामध्ये एक किंवा दोन दिवस जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशाचा काही भाग, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गंगेच्या पश्चिम बंगालच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, सिक्कीमचा काही भाग आणि ईशान्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - CM Eknath Shinde : द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करणार - मुख्यमंत्री शिंदे