पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे आज पुणे दौऱ्यावर असून, आज दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हडपसर येथे त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन ( Inaugurate of Park ) त्यांच्याच हस्ते आज होणार होते. अनेक सामाजिक संस्थांनी विरोध केल्याने आज होणारे उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात होता. परंतु, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर या उद्यानाला आनंद दिघे साहेबांचे नाव देण्यात आले.
महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली : महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवित शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे ( Former corporator Nana Bhangire ) यांनी हडपसर परिसरातील ( Hadapsar Area ) या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्यानाचे उद्घाटन रद्द करण्यात आले असून, त्याचे उदघाटन आता माजी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
महापालिकेच्या ठरावानुसार वैयक्तिक नावे देऊ नये : महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत.
पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान बनवले आहे. या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आले आहे. आता या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार असल्याने त्याबाबतची चर्चा सुरू झाली होती. परंतु, आता कार्यक्रम आयोजकांनी या उद्यानाल आनंद दिघे साहेबांचे नाव देऊन हा कार्यक्रम मार्गी लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
स्टेडियमचे उद्घाटनदेखील विना प्रोटोकॉल : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हडपसर येथे उभारलेल्या हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे स्टेडियमचे उद्घाटन महापालिकेलाच अंधारात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रोटोकॉल धुडकावून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. पुणे महापालिकेच्या निधीतून प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन करताना नगरसचिव विभागाकडून त्यासाठी प्रस्ताव ठेवला जातो. जर महापौर असतील तर पक्षनेत्यांच्या बैठकीत हे प्रस्ताव मान्य करून प्रोटोकॉल निमंत्रण पत्रिका छापून प्रोटोकॉलनुसार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची नावे टाकली जातात. पण तसे न करता थेट उद्घाटन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Ashish Shelar on Raut Arrest : हा तर मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांचा खून- भाजप नेते आशिष शेलार