ETV Bharat / city

KSHIPRA 2.0 व वीरांगना दालन, देशातील संरक्षण दलांच्या विभागाला पुरविणार आर्थिक सल्ला सेवा - pune veerangana dalan inauguration

रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहचा नामकरण समारंभही येथे पार पडला. हे सभागृह भारतीय सशस्त्र बंडाचे जनक ‘वासुदेव बलवंत फडके’ यांना समर्पित करण्यात आले. त्यांनी पुणे येथील पूर्वीच्या मिलिटरी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम केले होते. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाच्या 1864 साली बांधण्यात आलेली इमारत वास्तुरचनात्मकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे.

inauguration of kshipra two point zero and veerangana dalan in pune militery camp area
KSHIPRA 2.0 व वीरांगना दालन, देशातील संरक्षण दलांच्या विभागाला पुरविणार आर्थिक सल्ला सेवा
author img

By

Published : May 21, 2022, 12:42 PM IST

पुणे - रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) सतीश पेंढारकर (भा.र.ले.से.) यांनी रक्षा लेखा महानियंत्रक रजनीश कुमार (भा.र.ले.से.) यांचे कार्यालयाच्या प्रांगणात KSHIPRA 2.0 व “वीरांगना दालन” उद्घाटन समारंभात स्वागत केले. रक्षा लेखा विभागाद्वारे देशातील संरक्षण दलांना व संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या संस्थाना लेखापरीक्षण, लेखांकन, वेतन व आर्थिक सल्ला सेवा प्रदान केली जाते. रक्षा लेखा महानियंत्रक हे रक्षा लेखा विभागाचे प्रमुख होत.

देय असलेल्या पगार व भत्त्यांसंबंधी विस्तृत माहिती - क्षिप्रा 2.0 (KSHIPRA 2.0) रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान), पुणे कार्यालयाने बनवलेली शैक्षणिक वीडियोंची की एक मालिका आहे. ज्या माध्यमातून सेनेच्या जवानांना त्यांच्या भर्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंत, त्यांना देय असलेल्या पगार व भत्त्यांसंबंधी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.जवानांच्या वेतन खात्यांचे संवर्धन करण्याची पद्धति अत्यंत क्लिष्ट असून या प्रक्रियेत जवान / जेसीओच्या तैनातीचे यूनिट, जवानांच्या रेजीमेंटचे रेकॉर्ड कार्यालय तसेच रक्षा लेखा विभागाचे वेतन लेखा कार्यालयही आपापली भूमिका बजावतात. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालय आपल्या आठ वेतन लेखा कार्यालयांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख सेना जवानांना वेतन वितरित करते.

वासुदेव बलवंत फडके यांना समर्पित - रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहचा नामकरण समारंभही येथे पार पडला. हे सभागृह भारतीय सशस्त्र बंडाचे जनक ‘वासुदेव बलवंत फडके’ यांना समर्पित करण्यात आले. त्यांनी पुणे येथील पूर्वीच्या मिलिटरी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम केले होते. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाच्या 1864 साली बांधण्यात आलेली इमारत वास्तुरचनात्मकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे.

नवीन वातावरणासाठी स्वत:ला तयार करा - रजनीश कुमार (भा.र.ले.से.) रक्षा लेखा महानियंत्रक महोदयांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना कार्यालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात अधिकारीवर्गाला वेग व ऑटोमेशनच्या नवीन वातावरणासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी प्रेरित केले. विभागाला सोपविण्यात आलेले कर्तव्य बजावताना वेतनवृद्धिच्या दृष्टिकोणापेक्षा नवरचनात्मक दृष्टिकोण अवलंबण्याचे आवाहनही त्यांनी केले.

25 महिला स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानित - ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रमांचा एक भाग म्हणून रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाद्वारे,देशासाठी प्राणपणाने लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल,राणी अब्बक्का, झानों मुरमो यांसारख्या 25 महिला स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानित करण्यात आले. या वीरांगनांना समर्पित ‘वीरांगना दालना’चे उद्घाटन श्री रजनीश कुमार,भा.र.ले.से., र.ले.म.नि. यांच्या पत्नी,श्रीमती रत्ना कुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.