ETV Bharat / city

बारामतीत अंशतः लॉकडाऊन शिथील, आज आढळले फक्त 8 रुग्ण

बारामती शहर व तालुक्यात दिवसाला तीनशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र आज केवळ आठच रुग्ण आढळून आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून बंद असणारी विविध आस्थापने उद्यापासून (दि. ८) ठराविक वेळेसाठी सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

बारामतीत अंशतः लॉकडाऊन शिथील
बारामतीत अंशतः लॉकडाऊन शिथील
author img

By

Published : Jun 7, 2021, 9:11 PM IST

बारामती - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बारामतीत झपाट्याने रुग्ण संख्या वाढली होती. दररोज तीनशेहून अधिक बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत होती. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या व त्याची कडक अंमलबजावणी केल्याने बारामतीची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

बारामतीत अंशतः लॉकडाऊन शिथील

बारामतीमध्ये आज केवळ 8 रुग्ण आढळले

बारामती शहर व तालुक्यात दिवसाला तीनशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र आज केवळ आठच रुग्ण आढळून आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून बंद असणारी विविध आस्थापने उद्यापासून (दि. ८) ठराविक वेळेसाठी सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

बारामती अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात

कोरोना पॉझिटिव्हिटी दर ८ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने अनलॉकच्या प्रक्रियेत ‘लेव्हल-फोर’मध्ये मोडते. त्यामुळे बारामती शहर, ग्रामीणमध्ये आताच पूर्णपणे ‘अनलॉक’ होण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र अत्यावश्यक दुकानांना चारपर्यंत तर अन्य दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंदच ठेवली जाणार असून, त्यातून फक्त पार्सल सेवा देण्यात येणार आहे. व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर या दुकानात लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत माहिती दिली आहे. बारामतीत अत्यावश्यक वस्तू व सेवासंबंधित दुकाने ही सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अन्य दुकाने सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सायंकाळी पाच ते सकाळी पाच या कालावधीत संचारबंदी कायम असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

अशी असणार 'अनलॉक' प्रक्रिया
· मॉल, चित्रपटगृहे बंदच राहणार
· हॉटेल्स केवळ पार्सल किंवा होम डिलिव्हरी
· वॉकिंग, सायकलिंग, फिरणे पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत
· सर्व खासगी कार्यालये - ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील
· क्रीडा फक्त आऊट डोअर गेम्ससाठी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा राहील
· सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजक कार्यक्रम - ५० टक्के उपस्थिती
· लग्न - ५० लोकांची मर्यादा
· अंत्यसंस्कार - २० लोकांची मर्यादा
· जिम, कटिंग सलून, वेलनेस सेंटर्स : ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ९ वाजेपर्यंत

हेही वाचा - Pune Fire: पिरंगुट MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग, 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.