ETV Bharat / city

Pune Crime News: पुण्यात कुर्‍हाडीने वार करून एकाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक - Pune Latest news

पुण्यात उसन्या पैशाच्या वादातून कुर्‍हाडीने वार करून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात ( Criminal arrested ) आली आहे.

Hadapsar
हडपसर
author img

By

Published : Apr 5, 2022, 7:33 PM IST

पुणे: पुण्यातील हडपसर परिसरात एका 34 वर्षाच्या तरुणाची कुऱ्हाडीने वार ( man was stabbed ) करत हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास उसन्या पैशाच्या वादातून फुरसुंगी ( Fursungi murder over money dispute ) येथे पापडे वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. युवराज बाबुराव जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गणेश सुरेश खरात या सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण - या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवराज बाबुराव जाधव आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपी गणेश खरात याने युवराज जाधवकडून व्याजाने पैसे घेतले होते. युवराज मागील अनेक दिवसांपासून गणेश खरातकडे पैशाची मागणी करत होता. परंतु गणेश खरात हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता.

पण हा वाद शिगेला पेटला आणि याच रागातून युवराज जाधव याने गणेश खरात याच्या पत्नी विषयी अपशब्द वापरले होते. याच रागातून गणेश याने युवराज जाधव घराच्या अंगणात बसला असताना, पाठीमागून जाऊन कुर्‍हाडीने एकापठोपाठ एक असे अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने युवराज जाधव यांचा जागीच ( Death in a loan dispute ) मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; सराफा व्यावसायिकाला लुटले, पोलिसांचा धाक फक्त नावाला?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.