पुणे - मकर संक्रांत हा सण सूर्याशी आणि ज्ञानाशी निगडित आहे. प्राचीन काळामध्ये भारत देश म्हणजेच आर्यवर्तमध्ये मकर संक्रांतीपासून सूर्याचे तेज वाढायला सुरुवात होत असे. त्यासाठी मकर संक्रांत हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुर्याचे उत्तरायण सुरू होते. आपल्या येथे सहा ऋतू मानले जातात या सहा ऋतूंच्या चक्राचे उत्तरायण आणि दक्षिणायन, असे दोन भाग पडतात. सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे त्याचे मकर राशीत संक्रमण होते. म्हणून या सणाला अधिक महत्त्व ( Importance of Makar Sankranti ) आहे, अशी माहिती शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंत गाडगीळ यांनी दिली.
ते म्हणाले, मकरसंक्रांतीला महाराष्ट्रातील महिला देवीची पूजा करतात. संक्रांतीदेवीने या दिवशी संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात. महाराष्ट्रात या सणाचे तीन भाग असतात पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत असतो. दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. दक्षिणेतही तीन टप्प्यात हा सण साजरा केला जातो. पहिला दिवस हा इंद्राच्या नावाने साजरा केला जातो यामुळे यास इंद्र पोंगल म्हणताच. दुसरा दिवस हा सूर्याच्या नावाने साजरा केला जातो यामुळे यास सूर्य पोंगल तर तिसरा दिवस हा मनुष्याच्या नावाने साजरा केला जोता यामुळे यास मठ्ठ पोंगल, असे म्हणतात.
हेही वाचा - Sesame Jaggery Rate Hike : संक्रातीच्या तोंडावरच तीळ-गुळ महाग! किमतीत प्रति किलो 5 ते 10 रुपयांची वाढ