पुणे - देशामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्यात येतोय. आज रविवार (दि. 23 जुलै) पुण्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतीश पाटील, विश्वजीत कदम, तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. ( Ed Action Against Sonia Gandhi ) काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने नोटीस बजावली त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना भीती घालण्याचा हा प्रकार - माध्यमातून देश चालवण्याचा एक अधिकारपणा चालवला जात आहे. यातून लोकशाहीचा गळा घोटला जातोय. खोट्या केसेस दाखल केल्या जातात. त्यानंतर फक्त चौकशा करायच्या. पण त्यातून केसच्या शेवटपर्यंत जायचे नाही आणि त्यातून आम्ही तुमच्या सर्वोच्च नेत्याला धमकवतोय म्हणून सामान्य कार्यकर्त्यांना भीती घालण्याचा हा प्रकार असल्याचा टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेली आहे.
निषेध आंदोलन - पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज काँग्रेसच्या सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ई़डीने समन्स बजावले आहे. त्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
ईडीच्या माध्यमातून दबाव - देशात हुकूमशाही आली असून देशातील सर्व संस्थेवर सरकार नियंत्रण मिळवत आहे. सध्या सूडबुद्धीने हुकूमशाहीतून एकाधिकारशाही निर्माण होत आहे. आणि त्यातूनच विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबला जावा आमच्या विरोधात कोणीही बोलू नये यासाठी ईडीच्या माध्यमातून अशा कारवाया केल्या जात असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला आहे.
हेही वाचा - जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक