ETV Bharat / city

अटलजींना अनोखी आदरांजली: पुण्यात गव्हाच्या दाण्यांनी साकारले भारतरत्न 'अटल'जी - pune marathi news

निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त ९६ किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र साकारण्यात आले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
author img

By

Published : Dec 25, 2020, 5:02 PM IST

पुणे - देशात विविध पद्धतींनी अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. मात्र, पुण्यात गव्हाचे शेकडो दाणे, काळा मसाला, मीठ, साबुदाणा वापरुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारण्यात आले. ९६ किलो गहू वापरुन हे रेखाचित्र साकारले आहे. तसेच चित्रयज्ञाच्या माध्यमातून सलग १२ तास लहानांपासून मोठयांपर्यंत अनेकांनी विविध चित्रे देखील साकारली.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त ९६ किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र साकारण्यात आले. यावेळी निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, अ‍ॅड. वैजनाथ विंचूरकर, रामलिंग शिवणगे, अशोक कुलकर्णी, आदी उपस्थित होते. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
१०० किलो गहू वंचित विकास संस्थेला देण्यात येणार-उदय जोशी म्हणाले, सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे वर्षातून ८ ते १० कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम केले जातात. आदिवासी भागातील गरजू ते रिक्षाचालकांपर्यंत सर्वांना मदतीचा हात दिला जातो. यंदा अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र रेखाटून १०० किलो गहू वंचित विकास संस्थेला देण्यात येणार आहेत.
अटलजींना अनोखी आदरांजली
चित्र रेखाटण्याकरीता सुमारे साडे तीन तासांचा कालावधी लागला-अमोल काळे म्हणाले, गव्हांच्या सहाय्याने केलेले हे चित्र रेखाटण्याकरीता सुमारे साडे तीन तासांचा कालावधी लागला. ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच चित्रांच्या माध्यमातून देखील अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. ती चित्रे भारतीय जवानांना सैनिक मित्र परिवारातर्फे पाठविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सांगता सैनिक परिवारांतील सदस्यांच्या हस्ते दीपोत्सवाने करण्यात आली.

हेही वाचा- शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे स्वागत करावे, पंकजा मुंडेंचे रायगडमध्ये आवाहन

हेही वाचा- ममता सरकारनं पश्चिम बंगालला उद्ध्वस्त केलंय - पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.