ETV Bharat / city

पुण्यात धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून - पुण्यात तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून

पुण्यातील पप्पू जगताप यांच्या हॉटेलजवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर तीन भिकारी दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पप्पू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. पण भिकारी अजून कसे गेले नाहीत, म्हणून पप्पू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. यात तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजून निघाले आणि यात तिघांचा मृत्यू झाला. ( kills three beggars by pouring hot boiling water in pune )

pune beggars murder
पुण्यात तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून
author img

By

Published : Jun 3, 2022, 12:41 PM IST

Updated : Jun 3, 2022, 2:31 PM IST

पुणे - पुण्यातील सासवड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून केला आहे. या घटनेत तिन्ही कचरा वेचक भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( kills three beggars by pouring hot boiling water in pune )

हॉटेल चालकाने गरम उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून

तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजले - पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या हॉटेल चालकाने कचरा वेचक भिकाऱ्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्यांचा खून केला आहे. ही घटना 23 मे रोजी सासवडमध्ये घडली आहे. या हत्याकांडातील मयत तिन्ही भिक्षेकरी पपू जगताप यांच्या हॉटेल जवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पप्पू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. पण भिकारी अजून कसे गेले नाहीत, म्हणून पप्पू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. यात तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजून निघाले आणि यात तिघांचा मृत्यू झालाय.

पोलिसांकडून घटनेकडे दुर्लक्ष - ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले आहे, त्या ठिकाणपासून सासवड पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी ह्या घटनेकडे दुर्लक्ष केले. या हत्याकांडातील आरोपी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप हे स्थानिक आमदाराचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

23 मे रोजी घडली होती घटना - या प्रकरणी 30 मे रोजी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी पप्पू जगताप हा अजूनही फरार आहे. घटना ही 23 मे घडली असताना गुन्हा हा 30 मे रोजी दाखल झाल्याने पोलिसांवर स्थानिक आमदारांचा दबाव होता की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

शेवंताबाईचाही मृत्यू - 23 मे रोजी जेव्हा घटना घडली तेव्हा जे तीन भिकारी या घटनेत जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा ससून रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला तर तिसऱ्या शेवंताबाई जाधव यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली होती. काल त्यांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा - Nagpur News : गंमत म्हणून गळफास घेतल्याने 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated : Jun 3, 2022, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.