पुणे - लवकरच आपण 2021 ला निरोप देणार आहोत. वर्षारंभ म्हटला, की प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो. गत वर्षातले बरे-वाईट अनुभव विसरत नव्या वर्षात वाटचाल करण्याचा निश्चयदेखील या निमित्ताने केला जातो. आगामी वर्ष आपल्याला कसं जाईल, असा प्रश्न स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या मनात असतो. काही जण या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी काही ज्योतिष अभ्यासक यांचा सल्ला घेतात. नव्या वर्षात शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, नोकरी किंवा व्यवसाय आदी क्षेत्रात कसे अनुभव अपेक्षित असतील, या अनुषंगाने काही गोष्टी ते सांगतात. वर्षभरातल्या ग्रहयोगांचा या गोष्टींवर परिणाम होत असल्याने अशा अंदाजांना महत्त्व असतं, त्यामुळे येणारं नव वर्ष 2022 हे सर्व राशींसाठी कसं असेल, जाणून घेऊया.
कसं असेल नवं वर्ष? -
आर्थिकदृष्ट्या 2022 हे वर्ष 2021 च्या तुलनेत चांगलं असेल. कोरोनामुळे ज्या क्षेत्रांना फटका बसला, त्या क्षेत्रांना आगामी वर्षात दिलासा मिळू शकतो. याचाच अर्थ एकूण स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यावर्षी आश्चर्यकारक बदल होताना दिसतील. 2022 हे वर्ष शैक्षणिक (Education) आणि आरोग्यदृष्ट्या (Health) संमिश्र असेल. शिक्षणाचा विचार करता येत्या वर्षात विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. 2021मध्ये कोरोनामुळे (Corona) विस्कटलेली शिक्षण क्षेत्राची घडी आगामी वर्षात सुरळीत होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या आगामी वर्ष सर्वसाधारण राहील. तथापि, मुलांना आजार होऊ नयेत, यासाठी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.
येणाऱ्या संधींना पूर्णपणे ओळखून योग्य त्या संधीचं सोनं करण्याची या वर्षी गरज आहे. जे संधी ओळखून काम करतील, कष्ट करतील, त्या सर्वांना या वर्षी यश मिळू शकते. तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील हे वर्ष सर्वांसाठी सुखाच आणि समाधानकारक आहे. जरी या वर्षी अनेकांना आजारांना सामोरं जावं लागलं, तरी स्वतः कडे बघून सकारात्मकतेने पुढे जाण्याची गरज सर्वांना आहे. मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत हे वर्ष सर्वांसाठी सुखकारक आणि संधी मिळवून देणारं आणि फायदा देणारं आहे.
हेही वाचा- 19 to 25 December Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराना यांच्याकडून