ETV Bharat / city

Heavy Rain In Pune पुण्यात मुसळधार पाऊस, विजेच्या कडकडाट जोरदार पावसाची हजेरी - Pune Rain

Heavy Rain In Pune ण्यात आज सकाळपासूनच मोठी गर्मी जाणवत होती. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये पावसाने मुसळधार बॅटिंग सुरू केली असून ,विजेच्या कडकडाटसह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गणेश विसर्जनाच्या दोन दिवस अगोदरच पुण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पावसाने परत पुण्यात हजेरी लावलेली आहे

Heavy Rain In Pune
Heavy Rain In Pune
author img

By

Published : Sep 11, 2022, 8:45 PM IST

Updated : Sep 11, 2022, 10:10 PM IST

पुणे पुण्यात आज सकाळपासूनच मोठी गर्मी जाणवत होती. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये पावसाने मुसळधार बॅटिंग सुरू केली असून ,विजेच्या कडकडाटसह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गणेश विसर्जनाच्या दोन दिवस अगोदरच पुण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पावसाने परत पुण्यात हजेरी लावलेली आहे आणि पुण्यातील अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील वाहतूक सुद्धा थोडीशी शांत झालेली दिसत आहे. विशेषतः पुण्यातील परिसरामध्ये जो पाऊस आहे तो फार मोठा प्रमाणात पडत असून या ठिकाणी सुद्धा वाहतूक हळू झाल्याचे दिसत आहे.

दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता मुसळधार पावसामुळे शहरांमधल्या सखल भागांमध्ये पाणी साचले असून तसेच रस्त्यावरती पावसामुळे वाहतूक थोडी मंद झालेली आहे .ऑफिस टाईम असल्यामुळे पुणेकरांची घरी जाण्याची सुद्धा ही वेळ आहे. त्यामुळे पुण्यात थोडीशी जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याची दिसत आहे. पुढील दोन दिवस विदर्भात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. आज दिवसभरचं विदर्भात पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भात ११ ते १३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर असणार आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

वाहतूक कोंडी पुणे शहराला मुसळधार पावसाने चांगलंचं झोडपून काढलेलं आहे. या मुसळधार पडलेल्या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे, तर पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टेशन येथे ही पाणी साचल आहे.तसेच या मुसळधार पाऊसाने अनेक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन तासात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना, तर 5 ठिकाणी झाडपडीच्या नोंदी आल्या आहेत.

22 कुटुंबियांचा जीव धोक्यात कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आहे. दरम्यान पुणे महागरपालिका, एसआरए आणि खासगी बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांच्या मनमानी कामकाजामुळें येथील 22 कुटुंबियांचा जीव धोक्यात आला आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास तीन वर्षां पूर्वी जशी परिस्थिती झाली होती तशी स्थिती होण्याची शक्यता आहे.

पाणी साचलेले ठिकाण

1) चंदननगर पोलिस स्टेशन

2) वेदभवन, कोथरुड

3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड

4) लमाण तांडा, पाषाण

5) सोमेश्वर वाडी, पाषाण

6) वानवडी, शितल पेट्रोल पंप

7) बी टी ईवडे रोड

8) काञज उद्यान

झाडपडी झालेले ठिकाण

1) एनसीएल जवळ पाषाण

2) साळुंखे विहार, कोंढवा

3) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा

4) चव्हाणनगर

5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

धामोरी गावात बैल जोडी गेली वाहून अमरावती जिल्ह्याचा सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. जिल्ह्यातील दर्यापूर आणि भातकुली तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूर आला असून अनेकांच्या शेतात आणि घरात पाणी साचल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दर्यापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रचंड पाऊस कोसळल्याने हाकार उडाला. तालुक्यातील धामोरी गावात बैल जोडी अंबाडा नाल्यात वाहून गेली. मदलापूर गावालगत नाल्यामध्ये दोन्ही बैलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले.

शेतांमध्ये पाणीच पाणी दर्यापूर आणि भातकुली तालुक्यातील अनेक गावांमधील शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अनेक शेतांमध्ये पाणी तुंबल्यामुळे शेतांना तलावाचेच स्वरूप आले आहे.

अमरावती शहरातही मुसळधार पाऊस अमरावती शहरात दुपारी एक वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. दुपारी तीन ते पाच वाजे दरम्यान काहीसा काहीसा थांबलेल्या पावसाने पाच वाजता पुन्हा जोरदार बरसायला सुरुवात झाली. रात्री आठ वाजता देखील अमरावती शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. येत्या 36 तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 11, 2022, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.