पुणे - द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनतर्फे ( ICSE ) घेण्यात आलेल्या (इयत्ता दहावी) परीक्षेत पुण्यातील पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील ( St. Mary's School ) हरगुण कौर माथरू ( Hargun Kaur Mathru) ही देशात प्रथम आली आहे. आयसीएसईच्या (इयत्ता दहावी) परीक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थिनी, एका विद्यार्थ्याने ९९.८० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यात पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील हरगुण कौर माथरू हिचा समावेश आहे.
पहिल्या सत्रातील परीक्षेतील गुण पाहून आपल्याला चांगले गुण मिळतील असे वाटत होते. परंतु संपूर्ण देशात आपण पहिले येऊ असे कधीच वाटले नाही. पण देशात पहिला क्रमांक आल्याचा खूप जास्त आनंद वाटत आहे. कोरोना काळातही शाळेने ऑनलाइनद्वारे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आता विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. त्यातही अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र शाखेत पुढील शिक्षण घेण्याचा विचार आहे. अस यावेळी हरगुण कौर माथरू हिने यावेळी सांगितल आहे.
हेही वाचा - IND vs ENG 3rd ODI : हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी; भारताला विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य
निकाल रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर - सीआयएससीईतर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. देशातील दोन हजार ५३५ शाळांमधील दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात एक लाख २५ हजार ६७८ विद्यार्थी, तर एक लाख पाच हजार ३८५ विद्यार्थिनी होत्या. या निकालातही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थिंनीपैकी ९९.९८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९७ टक्के इतकी आहे.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स ( ICSE ) चा आयसीएसई ( ICSE board result ) इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 10वीचा निकाल आज ( 17 जुलै ) सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. आईसीएसई बोर्डाचे निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर जाऊन विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स ( ICSE ) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की टर्म-1 आणि टर्म-2 या दोन्ही परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यांकनाचे गुणही जोडले जातील. भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने 25 एप्रिल 2022 ते 23 मे 2022 या कालावधीत दहावीची टर्म-2 परीक्षा आयोजित केली होती. कोविड 19 मुळे यावर्षी परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी २७६ कोरोना रुग्णांची नोंद, २ मृत्यू