पुणे - पेट्रोल, डिझेल, गॅस या साऱ्या ( Petrol Disel Hike ) गोष्टींच्या महागाईचा फटका हा सामान्य पुणेकरांना गेल्या वर्षभर सोसावा लागला अनेक गोष्टींचे भाव वाढत असल्याने साऱ्यांच्याच खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे पुणेकरांच बजेटही कोलमडेल आहे. अशातच आता नवीन वर्षाच्या सुरवतीलाच आणखीन एक फटका पुणेकरांनी बसला आहे. आता सलूनमध्ये जाऊन केस कापणेही महागात पडणार आहे. कारण १ जानेवारीपासून कटिंग आणि दाढीचे भाव ( Salon Price Hike ) वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने ( Maharashtra Nabhik Mahamadal ) घेतला आहे.
२० टक्के दरवाढ होणार -
१ जानेवारीपासून कटिंग आणि दाढीच्या दरामध्ये २० टक्के (20 Percent Hike In Salon Price ) दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे आणि सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने होणाऱ्या वाढत्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सांगितलं आले आहे.
वाढत्या महागाईमुळे निर्णय -
मागील २ वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट ओढवल आणि सरकारला लॉकडाऊन लावावा लागला. या संकटामुळे राज्यातील व्यापार हा पूर्णपणे ठप्प होता. याचा फटका नाभिक व्यवसायालादेखील मोठ्या प्रमाणत बसला. त्यातच या व्यवसायासाठी लागणाऱ्या साऱ्याच वस्तूंची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली असल्याने हा भाववाढीचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला आहे. दरम्यान, या भवावाढीला पुणे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे नाभिक सेवा संघ, हडपसर आणि लोहगाव नाभिक सेवा संघ या साऱ्यात संघटनेने पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे शहराध्यक्ष महेश सांगळे ( Mahesh Sangle ) यांनी दिली आहे.
हेही वाचा - Sameer Wankhede Transferred : अखेर समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली