ETV Bharat / city

गुढीपाडव्यानिमित्त कोथरूडमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन; राजकीय मंडळींचा सहभाग - pune

गुढीपाडव्याचा पवित्र सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी कोथरूड येथील शिवाजी पुतळा चौकातून नळस्टॉप चौकातील राज्यमंत्री उद्यानापर्यंत शोभायात्रा आयोजित केली होती.

शोभायात्रा
author img

By

Published : Apr 6, 2019, 9:00 PM IST

पुणे - हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याच्या कोथरूड परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, नागरिक आणि राजकीय मंडळींनी यात्रेमध्ये सहभाग नोंदवला.

गुढीपाडव्याचा पवित्र सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी कोथरूड येथील शिवाजी पुतळा चौकातून नळस्टॉप चौकातील राज्यमंत्री उद्यानापर्यंत शोभायात्रा आयोजित केली होती. यावेळी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट, कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे नेते चंद्रकांत मोकाटे, आदी राजकीय मंडळी शोभायात्रेत सहभागी झाली होती.

शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना अभिवादन करत स्वच्छ भारत आणि मतदान हे पवित्र दान, आदी विविध विषयांवर तयार केलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शनही यावेळी केले.

Intro:पुणे - हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याच्या कोथरूड परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, नागरिक आणि राजकीय मंडळींनी यात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता.

Body:गुढीपाडव्याचा पवित्र सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी कोथरूड येथील शिवाजी पुतळा चौकातून नळस्टॉप चौकातील राज्यमंत्री उद्यानापर्यंत शोभायात्रा आयोजित केली होती. यावेळी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट, कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे नेते चंद्रकांत मोकाटे, आदी राजकीय मंडळी शोभायात्रेत सहभागी झाली होती.

दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना अभिवादन, स्वच्छ भारत आणि मतदान हे पवित्र दान, आदी विविध विषयांवर तयार केलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन ही यावेळी केले.

Vis Sent on Mojo
Gudi Padala 1 to 10.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.