पुणे : वेदांत प्रकल्पावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज तळेगाव येथे जन आक्रोश आंदोलन करत सत्ताधारी शिंदे सरकार टीका केली (Chandrakant Patil criticizes Aditya Thackeray) आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी वेदांत प्रकल्पाबाबत घटनाक्रम जाहीर करावी. त्यांनी आपल्या अहंकारामुळे मुंबईची वाट लावली. ते जे आक्रोश यात्रा काढत आहे. ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे. ते स्वतःहून सांगत आहे, की आम्ही कसं हे प्रकल्प पळवलं, अशी टीका यावेळी पाटील यांनी (Chandrakant Patil over Vedanta project) केली.
जनतेत सरकारबद्दल प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी - राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री यांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भूमिका मांडली. आज राज्याचे पालकमंत्री म्हणून विविध मंत्र्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यात मला पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यानुसार जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी तसेच रेंगाळलेले विकास काम करण्यासाठी आणि लोकांच्या मनात सरकारबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी देण्यात आली आहे. ती मी पूर्ण करेल. असा विश्वास जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं (Chandrakant Patil criticizes in Pune) आहे.
तपास यंत्रणांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने जे काल आंदोलन करण्यात आला आहे. त्यांत पाकिस्तान जिंदाबादचे नारे मारण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याबाबत पाटील म्हणाले की, हा खूप संवेदनशील विषय आहे. तपास यंत्रणा प्रभावीपणे देशात काम करत आहे. 2014 पासून कुठलंही बॉम्ब स्फोट झाला नाही. काश्मीरमधील हल्ले प्रतिहल्ले कमी झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, तपास यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. त्यांना काम करू द्या. ते त्यांच्या पद्धतीने चौकशी करतील, असं देखील यावेळी पाटील (Vedanta project) म्हणाले.