पुणे: क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु ( Hutatma Martyr Shivram Hari Rajguru ) यांच्या 91 व्या बलिदान दिनानिमित्त ( Shaheed Diwas 2022 ) पुण्याच्या राजगुरूनगर येथील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळी वाड्यामध्ये आणि स्मृतीस्थळावर तहसीलदारांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण करुन सलामी देण्यात ( Flag Hosting At Rajgurus Birth Place ) आली. यावेळी राजगुरुनगर शहरातुन रिक्षाची रॅलीही काढण्यात आली. राजगुरूनगर येथील क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी स्मारक समितीच्यावतीने ध्वजारोहण तसेच अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू गेले होते फासावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रातिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य हे आजही युवकांना प्रेरणा देते. त्यातीलच एक म्हणजे शहीद राजगुरू. राजगुरू यांनी भगतसिंग आणि सुखदेवसह फासावर जाऊन देशाच्या स्वातंत्र्याबाबतची त्यांची निष्ठा प्रखरतेने दाखवून दिली होती. आजच्या दिवशी 23 मार्च 1931 ला त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे, आजचा हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. राजगुरूनगर येथील क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी स्मारक समितीच्यावतीने ध्वजारोहण तसेच अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.
प्रखर देशभक्तीचे धगधगते निखारे क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन धगधगते निखारे होते. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या जात असताना या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु आहेत. यावेळी स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख, पुरातन विभागाचे प्रमुख विलास वाहणे, तहसिलदार वैशाली वाघमारे, नगरपरिषद निवेदिता घारगे यांच्यासह राजगुरु प्रेमी उपस्थित होते.