पुणे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार MLA Rohit Pawar is the director हे देखील आल्याचे दिसते आहे. रोहित पवार MLA Rohit Pawar यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी Green Acre Company investigated by ED करण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रीन एकर कंपनीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. त्या नुसार या कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले. आमदार रोहित पवार काही दिवस संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राकेश वाधवान सुद्धा या कंपनीतसहभागी होते. ते सध्या एस बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी आहे. सध्या ही चौकशी प्राथमिक आहे. यात जर काही गैरप्रकार आढळले, तर रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्रीन एकर कंपनी ही आमदार रोहित पवार यांनी ७ वर्षांपूर्वी स्थापन केली होती. ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २००६ ते २०१२ पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील २००६ ते २००९ पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते.
ईडीला या कंपनीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. कंपनीची बॅलेन्स शिट मध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जवळपास १० कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा स्वप्ना पाटकरांची संजय राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात जबानी