पुणे- एकीकडे कोरोनाच्या संकटात करसंकलन कमी होत असताना व्यापाऱ्याकडून होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल 233 कोटी रुपयांची खोटी बिले देऊन परतावा म्हणून 41 कोटी रुपये ( false GS bills of Rs 233 crore ) केंद्र सरकारकडून उकळणाऱ्या व्यापाऱ्याला जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे. आफताब मुमताज रहमानी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपीला जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्यवसायिकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्या विरोधात कार्यवाही ( Maharashtra GST department actions ) सुरुच ठेवली आहे. त्यानुसार आफताफ रेहमानी याच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे.अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवा कर कायदा २०१७ या अंतर्गत नोंदणी दाखला घेतला.
हेही वाचा-रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे खरंय का?
आरोपीने अशी केली सरकारची फसवणूक
कंपनीच्या माध्यमातून आफताफ रेहमानी याने २०० कोटी रकमेची फक्त बिले देऊन ४१ कोटी ९५ लाखांचा आयटीसी ( इनपुट टॅक्स क्रेडिट) ( Input Tax Credit fraud case Pue ) पुढील खरेदीदारांना पाठविला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय बोगस खरेदी दाखविली. या देयकातून सुमारे २७ कोटी ७ लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. राज्यकर आयुक्त सचिन सांगळे यांच्या प्रयत्नातून ही अटक कारवाई करण्यात आली.आणि आफताफ रेहमानी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- Minister Varsha Gaikwad - शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
असा प्रकार आला उघडकीस
आफताब राहेमानी याने अनेक बोगस कंपन्यांकडून कुठल्याही वस्तू सेवेच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय बोगस बिलाद्वारे 27 कोटी रुपयांचा परतावा घेतला. याची कुणकुण लागल्यानंतर 2019 पासून जीएसटीच्या व्हिजिलन्स विभागाने त्याच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर हा संपूर्ण घोटाळा उघड आल्याची माहिती राज्य कर विभागाचे सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांनी दिली आहे.