पुणे- पुण्यातील उप बाजारामध्ये शुक्रवारी एकूण 213 गाड्याची आवक झाली असून त्यातून 4970 क्विंटल भाजीपाला फळे माल उपलब्ध झाला आहे. शहराला जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी मोशी, मांजरी आणि उत्तमनगर उप बाजार शुक्रवारी खुले ठेवण्यात आले आहेत.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे पुण्यातील मुख्य मार्केट असलेले मार्केट यार्ड बंद आहे तसेच आज खडकी उप बाजार ही स्थानिक पोलीस स्टेशनने दिलेल्या पत्रानंतर बंद ठेवण्यात आला आहे. शहरातील मोशी, मांजरी आणि उत्तमनगर या उप बाजारात शुक्रवारी एकूण 213 गाड्यांची आवक झाली आहे. त्यातून 4970 क्विंटल भाजी पाला फळे माल उपलब्ध झाला आहे.
मांजरी उप बाजारात 105 गाड्याची आवक झाली ज्या माध्यमातून 1950 क्विंटल माल बाजारात उपलब्ध झाला आहे. मोशी उप बाजारात 99 गाड्याची आवक झाली असून 2900 क्विंटल माल उपलब्ध झालाय. उत्तमनगर उप बाजारात 9 गाड्याची आवक होऊन 120 क्विंटल माल उपलब्ध झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कडून देण्यात आली आहे.