ETV Bharat / city

Four People Died in Pune : पुण्यात सेप्टिक टँक साफ करताना चौघांचा गुदमरून मृत्यू - Four died of suffocation in Pune

पुण्यातील लोणी काळभोर गावात एका खाजगी राहत्या घरात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून चौघांचा मृत्यू ( Four People Died in Pune ) झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Four People Died in Pune
पुण्यात सेप्टिक टँक साफ करताना चौघांचा गुदमरून मृत्यू
author img

By

Published : Mar 2, 2022, 2:15 PM IST

Updated : Mar 2, 2022, 5:23 PM IST

पुणे - पुण्यातील लोणी काळभोर गावात एका खाजगी राहत्या घरात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून चौघांचा मृत्यू ( Four People Died in Pune ) झाला आहे. ही घटना कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. हि घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

पोलिसाची प्रतिक्रिया

मयत व्यक्तींची नावे -

सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर), रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे, (वय- ४५ ) घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Four People Died in Pune
सेप्टिक टँक

दोघांना वाचवायला गेले आणि स्वतःही पडले -

मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे राजेंद्र जयसिंग काळभोर यांची जय मल्हार कृपा नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुरु होते. टाकी साफ करताना त्यांच्यापैकी एकजण व्यक्ती टाकीत पाईप टाकताना तोल जावून टाकीत पडला. सदर पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीपण या टाकीत पडला. यावेळी टाकीत पडलेल्या दोघांना वाचविताना वरील दोघेही टाकीत पडले. आणि यामध्येच या चौघांचाही मूत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचा - Fadnavis Comment On Govt : महाविकास आघाडी सरकार दाऊद समर्पित - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 2, 2022, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.