पुणे - उत्तर प्रदेश येथील माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा याला उत्तर प्रदेश टास्क फोर्सने पुण्यातील हडपसर येथून अटक केली आहे. बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा - MPSC Students : पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित; पोलिसांचा कडक बंदोबस्त
विष्णू मिश्राला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखांचे बक्षीस ठेवले होते. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे. चार वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले विजय मिश्रा यांना २०२० मध्ये मध्यप्रदेशातून अटक केली होती. त्यांचे नातेवाईक कृष्ण मोहन तिवारी यांनी त्यांच्यावर संपत्तीबाबत आर्थिक फसवणूक, जिवे मारण्याची धमकी आदी आरोप केले आहेत.
विष्णूवर बलात्कार, फसणुकीसह अनेक गंभीर आरोप आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होती. विष्णू मिश्राला पकडण्यासाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यांनतर त्याचा शोध देखील सुरू होता. उत्तर प्रदेश टास्क फोर्सला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मिश्रा याला हडपसर येथून ताब्यात घेतले.
हेही वाचा - पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, नदीपात्र स्वच्छता करणाऱ्या तरुणाला लंडनचा 'पॉईंट ऑफ लाईट' पुरस्कार