पुणे - कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन याने अनेक देशांमध्ये आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, जगात पुन्हा कोरोनाबाबतची चिंता वाढली आहे. भारतात देखील ओमायक्रॉनने शिरकाव केला असून राज्यातील डोंबिवलीत त्याचा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर या नवीन व्हेरिएंटच्या संसर्गतेबाबत आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोडवे यांच्याशी चर्चा केली असता त्यानी येत्या महिन्याभरात तिसरी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा - काँग्रेस शिवाय आघाडी झाली तर, ती अप्रत्यक्षपणे मोदींना मदत - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन बाधित सापडल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीवरून सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती.
राज्यात अशा पद्धतीचे ओमायक्रॉनचे रुग्ण हे सापडतील हे निश्चित आहे. कारण महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या कर्नाटक आणि गुजरात या राज्यात याचे रुग्ण सापडले आहेत. हा विषाणू अशा पद्धतीने वाढणार असून राज्यातील या विषाणूचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 8 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत एकट्या मुंबईत 2 हजार 500 प्रवासी हे विविध देशांतून जाऊन आलेले आहे. आणि त्यांच्यापासून हे विषाणू पसरतील हे नक्कीच होते. त्यामुळे, या नवीन प्रकाराचे रुग्ण राज्यात वाढणार आणि त्याची मोठी साथ येणार आहे. येत्या महिन्याभरात तिसरी लाट येईल, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
हेही वाचा - MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट