ETV Bharat / city

पुणे विभागात महापुराचे 54 बळी; 8 हजार जनावरे बेपत्ता, 19 हजार घरांची पडझड - विभागीय आयुक्त

पूरपरिस्थितीमुळे आत्तापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हजारहून अधिक जनावरे बेपत्ता असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

author img

By

Published : Aug 16, 2019, 6:17 PM IST

पुणे - पूरपरिस्थितीमुळे आत्तापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगलीतील 26, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, साताऱ्यातील 8 तसेच पुणे जिल्ह्यातील 9 आणि सोलापुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. चार नागरिक अद्यापही बेपत्ता असून, पुराच्या फटक्याने आठ हजारहून अधिक जनावरे बेपत्ता आहेत. यामध्ये गाय आणि म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तसेच 166 लहान वासरे व गाढवे बेपत्ता असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात अजूनही 8 बचाव पथके तैनात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराची स्थिती निवळली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता, आरोग्य व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे. पुणे विभागातील 33 हजार 775 पूरग्रस्त कुटुंबांना 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे अनुदान म्हणून वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, एकूण 1 हजार 169 घरांची पूर्णत: तर 18 हजार 533 घरांची अंशत: अशी मिळून 19 हजार 702 घरांची पडझड झाली आहे. तसेच सध्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील प्रभावित कुटुंबांना 10 हजार तसेच शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे तत्काळ अनुदान देण्याचा निर्णय झाल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात वाटण्याचे काम सुरु असून, उर्वरीत रक्कम कुटुंबीयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात 33 हजार 775 बाधित कुटुंबांना 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोखीचे वाटप करण्यात आले आहेत. यासोबत पुणे विभागातील 23 हजार 889 कुटुंबांना प्रत्येकी 2388.9 क्विंटल गहू व तांदुळ तसेच 10 हजार 251 लीटर केरोसिनचे वाटप करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

Intro:(पुराचा फाईल फोटो वापरावा)

पुणे विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. चार नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय पुराच्या तडाख्यात आठ हजारहून अधिक जनावरे बेपत्ता आहेत..यामध्ये
गाय व म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात अजूनही 8 बचाव पथके तैनात आहेत..अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे दिली
Body:महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे. पुणे विभागातील 33 हजार 775 पुरग्रस्त कुटुंबांना अनुदानापोटी 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरबाधित क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून विभागात एकूण 1 हजार 169 घरांची पूर्णत: तर 18 हजार 533 घरांची अंशत: अशी मिळून 19 हजार 702 घरांची पडझड झाली आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकाव्दारे दिली आहे.
Conclusion:शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरु असून उर्वरीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात 33 हजार 775 बाधित कुटुंबांना 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमेचे वाटप करण्यात आले आहेत. त्याच बरोबर पुणे विभागातील 23 हजार 889 कुटुंबांना गहू व तांदुळ प्रत्येकी 2388.9 क्विंटल तर 10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.