पुणे - येथील कोंढवा रत्नाकर शेळके डान्स अकादमीच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक विश्वविक्रम केला आहे. महाराष्ट्राची लोककला म्हणजेच लावणी जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील ५ हजार नृत्यांगणांनी लावणी सादर करत हा विश्वविक्रम केला आहे. यावेळी या नृत्यांगणांना नृत्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा - '६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सुरेल सांगता
या विश्वविक्रमामध्ये महाराष्ट्रातील ६० लावणी सम्राज्ञींना नृत्यरत्न आणि युवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कलाकार, अनाथ मुली, अंध मुली तसेच विदेशी मुलींनीही सहभाग नोंदवला आहे.