ETV Bharat / city

पुण्यातील येरवडा कारागृहातून खिडकीचे गज कापून पाच कैदी पळाले - पुणे गुन्हे बातमी

कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींगमधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला.

yerawada jail
पुण्यातील येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले
author img

By

Published : Jul 16, 2020, 9:49 AM IST

पुणे - येरवड्यात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून बुधवारी मध्यरात्री पाच कैदी पळून गेले आहेत. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगन चव्हाण आणि सनी पिंटो अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत.

कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींगमधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला.

या कैद्यांमध्यव तिघेजण दौंड तालुक्यातील, एक जण पुणे शहरातील आणि एक जण हवेली तालुक्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी दौंड, वाकड, आणि हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या हे तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. येरवडा कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी काही कैद्यांना या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.