ETV Bharat / city

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला तक्रार अर्ज दाखल - pune breaking news

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पहिली तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.

first-complaint-filed-in-pooja-chavan-suicide-case
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला तक्रार अर्ज दाखल
author img

By

Published : Feb 25, 2021, 8:22 PM IST

पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पहिली तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार अर्ज दाखल केला आहे. तत्पुर्वी भाजप युवा मोर्च्याच्या वतीने वानवडी पोलीस स्टेशन समोर संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्च्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तसेच संजय राठोड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला तक्रार अर्ज दाखल

दरम्यान, याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने त्याचा फायदा घेत पोलीस या प्रकरणाचा तपास करण्याचे टाळत आहे आहेत. असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो तक्रार दाखल करण्याची गरज होती. मात्र आता जर तक्रार नसेल तर अशा गंभीर प्रकारात आरोपी वर कारवाई व्हावी, यासाठी सुजाण नागरिक म्हणून तक्रार दाखल करत असल्याचे स्वरदा बापट यांनी सांगितले.

पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप-

विरोधी पक्ष भाजपाने, हे प्रकरण लावून धरले असून भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत संजय राठोड हेच हत्यारा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या प्रकारणात कोणीही तक्रार केली नसल्याचे कारण देत पोलीस हे प्रकरण दाबत आहेत. पोलीस संजय राठोड यांच्या दावणीला बांधले असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.

एकंदरीतच या प्रकरणात ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेतली. आपल्या विरुद्ध हे षडयंत्र असल्याचे आणि आपली नाहक बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते. आता भाजपच्या स्वरदा बापट यांनी या प्रकरणात तक्रार दिल्याने संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

काय म्हटले तक्रारीत-

घटनेच्या कलम 306 व 107 प्रमाणे संजय राठोड यांच्यावर एफआयआर दाखल करावा असा अर्ज स्वरदा बापट यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या 12 ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड या युवकाला दिले आहेत. या ऑडिओ क्लिपमधून पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे संबंध होते हे समजते. त्यातून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंग किंवा राठोड यांच्याकडून होणाऱ्या दबावामुळे पूजा चव्हाण हिला आत्महत्या प्रेरित केल्याचे निष्पन्न होते आहे. पुरावे नष्ट करण्यास एका युवकाला (अरुण राठोड) याला आदेश दिल्याचेही निष्पन्न होते आहे. त्यामुळे याप्रकरणी एफआयआर नोंद करून आणि पुढील कारवाईबाबत लवकरात लवकर आदेश काढावेत आणि आरोपीला अटक करावी, अशी मागणी एक सुजाण नागरिक म्हणून करीत असल्याचे स्वरदा बापट यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

हेही वाचा- ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म्ससाठी नवी नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.