ETV Bharat / city

हिंदी सिने कलाकारांच्या कारचे डिझाइन बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

हिंदी सिनेअभिनेते आणि अभिनेत्री यांच्या कार चे डिझाइन बनवणाऱ्या कंपनीला मंगळवारी भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे.

कंपनीला लागलेली आग
कंपनीला लागलेली आग
author img

By

Published : Jan 15, 2020, 2:47 AM IST

Updated : Jan 15, 2020, 3:56 AM IST

पुणे - पिंपरी - चिंचवडमध्ये प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते आणि अभिनेत्री यांच्या कार चे डिझाइन बनवणाऱ्या कंपनीला मंगळवारी भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

कंपनीला लागलेली आग
दिलीप चेंबर्स कंपनीचे नाव असून दिलीप छाब्रीया अस कंपनीच्या मालकाचे नाव आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून ही कंपनी बंद आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेत किती नुकसान झाले हे समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन जवनानाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवडमधील दिलीप चेंबर्स या कार डिझाइन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. त्यामुळे धुरांचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बंब कमी पडत असल्याने आणखी खासगी कंपनीचे बंब पाचारण करण्यात आले. दरम्यान, एकूण ८ अग्निशमन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी तीन अधिकारी आणि २७ कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. रात्री अकरा वाजेपर्यंत एक बंब घटनास्थळी ठेवण्यात आला होता. अशी माहिती अशोक कानडे यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेत स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहेत.

हेही वाचा - BREAKING : निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंगने दाखल केला दयेचा अर्ज..

Intro:mh_pun_05_av_fire_mhc10002Body:mh_pun_05_av_fire_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये दिगग्ज हिंदी सिनेअभिनेते आणि अभिनेत्री यांच्या कार चे डिझाइन बनवणाऱ्या कंपनीला आज भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी सहा च्या सुमारास लागली होती. दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

दिलीप चेंबर्स कंपनीचे नाव असून दिलीप छाब्रीया अस कंपनीच्या मालकाचे नाव आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून ही कंपनी बंद आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेत किती नुकसान झालं आहे हे समजू शकलेले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन जवनानाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा च्या सुमारास चिंचवडमधील दिलीप चेंबर्स अस कार डिझाइन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. दुरांचे लोळ काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही बंब घटनास्थळी पोहचले. मात्र, ते ही बंब कमी पडत असल्याने आणखी खासगी कंपनीचे बंब पाचारण करण्यात आले. असे ऐकून ८ अग्निशमन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी तीन अधिकारी आणि २७ कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. रात्री अकरा वाजे पर्यंत एक बंब घटनास्थळी ठेवणार असल्याची माहिती अशोक कानडे यांनी दिली आहे. या घटनेत स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहेत. Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 3:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.