पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथे संगणक दुकानाला भीषण आग लागली आहे. यात झोपलेल्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. अंकित अनिल अगरवाल (वय 27) असे मृत्यू झालेल्या कामरागाचे नाव असून तो मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. दरम्यान, संगणक दुरुस्ती आणि झेरॉक्सचे दुकान हे एकत्रच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी यमुनानगर येथे आज सकाळी सातच्या सुमारास संगणक दुरुस्ती करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत दुकानात झोपलेल्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दहा लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट -
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. तर, मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. झेरॉक्स आणि संगणक दुरुस्तीच्या दुकानातील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जाळून खाक झाले असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन जवानांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - हत्तीला धडकून पुरी-सूरत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली; प्रवासी सुखरुप