ETV Bharat / city

'सीरम'कडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत; पुनावालांची घोषणा

fire at the Serum Institute
fire at tसीरम इन्स्टिट्यूटमध्ये आगhe Serum Institute
author img

By

Published : Jan 21, 2021, 3:13 PM IST

Updated : Jan 21, 2021, 10:13 PM IST

22:08 January 21

सीरम इंस्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात

पुणे - पुण्याच्या मांजरी भागातील सीरम इंस्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून कुलींगचे काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती. पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आहे. तर सीरमकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत पुनावालांनी जाहीर केली आहे.  

21:49 January 21

मृतांच्या नातेवाईकांना सीरमकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर

twitter

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत, असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.  

20:47 January 21

पुणे - मृतांच्या नातेवाईकांना सीरमकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनेी यासंदर्भात माहिती दिली आहे.    

20:37 January 21

उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत.    

19:28 January 21

सीरम इन्स्टिट्यूटच्या आतील दृश्ये..

सीरम इन्स्टिट्यूमधील काही ठिकाणची आग पूर्णपणे विझवण्यात आली असून, त्याठिकाणी कूलिंगचे काम सुरू आहे. आगीत जळालेल्या भागाची ही आतील काही दृश्ये..

19:13 January 21

सीरममधील आग पुन्हा भडकली

पुणे - सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेली आग विझवण्यात आली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास ही आग पुन्हा भडकली आहे. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

19:11 January 21

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये  नेले आहेत.  

  • 1) रामा शंकर हारिजण ( रा. उत्तरप्रदेश)
  • 2) बिपीन सरोजी (रा. उत्तरप्रदेश)
  • 3) सुशीलकुमार पांड्ये ( रा. बिहार)
  • 4) महेंद्र इंगळे (रा. पुणे)
  • 5) प्रतिक पास्त (रा. पुणे)

19:00 January 21

मुख्यमंत्री ठाकरे उद्या देणार सीरम इन्स्टिट्यूटला भेट

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्या (22 जानेवारी) दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या  प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.  

18:48 January 21

आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू - महापौर मुरलीधर मोहोळ

महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे - मांजरी येथे असलेल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये पाच मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकृत माहिती दिली आहे.  

मांजरी येथे सीरम कंपनीमध्ये बीसीजी प्लांटच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. याबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनीही एक ट्वीट केले होते. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही मजल्यांचे मात्र नुकसान झाले आहे, असे अदर पुनावाला यांनी सांगितले होते.

18:25 January 21

सीरममध्ये आग लागली की लावली गेली - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई - सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबाबत अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे. सीरम इंस्टिट्यूटमध्ये आग लागली आहे की लावली गेली आहे हे बघायला हवे, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली आहे.

18:18 January 21

वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. तसेच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे.इमारतीचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.  

17:54 January 21

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू

pune
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहौळ यांची माहिती

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आज देुपारी एक वाजता सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीत आग लागली होती.  

17:20 January 21

सीरम इन्स्टिट्यूटमधील आग नियंत्रणात - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीला लागलेली आग आता नियंत्रणात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  यातून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

17:15 January 21

कोरोना लस निर्माण होणाऱ्या ठिकाणी आगीचा प्रादुर्भाव नाही- मंत्री राजेंद्र शिंगणे

मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई - कोरोना लस निर्माण होणाऱ्या ठिकाणी आगीचा प्रादुर्भाव नसल्याची माहिती मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

17:01 January 21

आगीत कोणतीही जीवितहानी नाही - अदर पुनावाला

fire
अदर पुनावाला यांची माहिती

पुणे - तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सीरम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे.  

16:27 January 21

घटनेत कोणतीही जीवितहानी नाही - पुणे पोलीस आयुक्त

मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
पुणे पोलीस आयुक्त

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच येथील कोव्हिशिल्ड लस पुर्णपणे सुरक्षित असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.  

16:20 January 21

मुख्यमंत्री कार्यालय सगळ्या घटनेची माहिती घेत आहे

cmo
मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

मुंबई - मुख्यमंत्री कार्यालय सगळ्या घटनेची माहिती घेत आहे. तसेच पुणे महानगरपालिका आणि इतर उपाययोजना करणाऱ्या संस्थांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

16:16 January 21

एनडीआरफची टीम सीरम इन्स्टिट्यूटकडे रवाना

आग विझवताना कर्मचारी

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. यानंतर एनडीआरफची टीम सीरम इन्स्टिट्यूटकडे रवाना झाली आहे.    

16:10 January 21

तपास यंत्रणा आगीचा रिपोर्ट केंद्रीय गृह खात्याला सादर करणार

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीबाबतचा रिपोर्ट तपास यंत्रणा ही केंद्रीय गृह खात्याला सादर करणार आहेत.  

16:02 January 21

इमारतीत काही ठिकाणी स्फोट

प्रतिनिधींनी घटनास्थळावरून घेतलेला आढावा

पुणे - सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.  

15:57 January 21

कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही

fire
कोविशिल्ड लस सुरक्षित

पुणे -  जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

15:35 January 21

कोरोना प्रतिबंधात्मक लसीला कोणताही धोका नाही

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

पुणे - कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरू आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे. आज दुपारी एक वाजता सीरम इन्स्टीट्यूटच्या इमारतीला आग लागण्यची माहिती मिळत आहे.

15:33 January 21

बीसीजी लस तयार करण्यात येत असलेल्या इमरतीला लागली आहे

live
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

पुणे - कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज आग लागली. या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे.  

15:27 January 21

अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे -  सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी एक वाजता भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे.  

15:01 January 21

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

पुणे - पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे. पुण्यातील मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी एक वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Last Updated : Jan 21, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.